VIDEO: बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आईचा लेक जिंकला आमदारकी, मुलाचा बहुमान पाहून मातेला अश्रू अनावर

VIDEO: बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आईचा लेक जिंकला आमदारकी, मुलाचा बहुमान पाहून मातेला अश्रू अनावर

बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या मातेच्या लेकराने आमदारकी जिंकल्यामुळे सध्या सगळीकडे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 25 ऑक्टोबर : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अशात चर्चा आहे ती चंद्रपूरचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांची. बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या मातेच्या लेकराने आमदारकी जिंकल्यामुळे सध्या सगळीकडे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अगदी हालाकीचे दिवस काढत आता विधानसभेत जागा मिळवल्यामुळे जोरगेवार यांनी सगळ्यांचे आभार मानले. यावेळी आपल्या लेकराला मिळालेला बहुमान पाहून आईचा उर भरून आला आणि त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबले नाहीत.

जेव्हा जोरगेवार हे विजयी झाल्यानंतर लोकांनी ढोल-ताश्यामध्ये त्यांच्या विजयाची मिरवणूक काढली. त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या. जनतेचा आपल्या लेकराप्रती बहुमान पाहिल्यानंतर जोरगेवार यांच्या आईला अश्रू अनावर झाले. यानंतर जोरगेवार यांनी आपल्या गळ्यातले सगळे हार काढत आईच्या गळ्यात घातले आणि विजयाचं सगळं श्रेय आईला दिलं. हा प्रसंग पाहिल्यानंतर तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. जोरगेवार यांच्या विजयाचं सर्व स्थरातून कौतूक होत आहे.

चंद्रपूर मतदारसंघातमध्ये अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार भाजप उमेदवाराचा पराभव करत 73 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. आपल्या मुलाचा हा विजय पाहून आईचा उर भरून आला. आईच्या डोळ्यांतील आनंदाचे अश्रू पाहिल्यानंतर जोरगेवारदेखील भाऊक झाले. त्यांच्या यशाचं सर्व श्रेय त्यांनी आईला दिलं आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी आईचा आशीर्वाद घेतला. खरंतर जोरगेवार हे दलित समाजातील आहेत. आपल्या अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी हा विजय मिळवला.

इतर बातम्या - महाराष्ट्राच्या राजकारणातील नवं पर्व, रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंना फोन आणि...

जोरगेवार यांच्या आई चंद्रपूर शहरातील गांधी चौकात बांबूच्या टोपल्या विकतात. अगदी हालाकित्या काळात त्यांनी त्यांच्या लेकराला मोठं केलं. त्यामुळेच कदाचित लेकाराचा बहुमान पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. इतर लोकही जोरगेवार यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतूक करत आहेत.

दरम्यान, तब्बल 73 हजार मतांच्या फरकाने विजय जोरगेवार यांनी विजय मिळवला आहे. 2014च्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं. पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. नंतर त्यांनी शिवसेनेच्या मदतीने निवडणूक लढवली. तेव्हा त्यांना काही मतांनी पराभव पत्कारावा लागला. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण तिथेही त्यांना तिकीट देण्यासाठी नकार देण्यात आला. त्यामुळे अखेर त्यांनी अपक्ष उभं राहून निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला.

इतर बातम्या - भाजपच्या अनेक खासदारांचा दाऊदशी संबंध, राष्ट्रवादी नेत्याचा खळबळजनक आरोप

'देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी काकूंची मोर्चेबांधणी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची आज सकाळी भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. सकाळी शोभाताई जोरगेवार यांच्या घरी गेल्या आणि त्यांचं अभिनंदन केलं. जोरगेवार हे कुठल्या पक्षात नसले तरी त्यांची भाजपसोबत जवळीक होती. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. शोभाताईंनी जोरगेवार यांना भाजपचं तिकीट मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळे त्यांनी चंद्रपूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

भेटीनंतर शोभाताईंनी कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही. मात्र त्यांची ही भेट जोरगेवार यांचा पाठिंबा मिळविण्यासाठीच होती अशी माहिती सूत्रांनी दिलीय. जोरगेवारही भाजपला पाठिंबा देतील अशी शक्यताही व्यक्त केली जातेय. जिरगेवार यांनी भाजपचे 2 वेळा आमदार राहिलेले नाना शामकुळे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

First Published: Oct 25, 2019 07:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading