शिवाजी महाराजांच्या वंशजांनंतर आता होळकरांचे वंशजही भाजपमध्ये

शिवाजी महाराजांच्या वंशजांनंतर आता होळकरांचे वंशजही भाजपमध्ये

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

सागर कुलकर्णी, (प्रतिनिधी)

मुंबई,22 सप्टेंबर: छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वंशज उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भूषणसिंह होळकर यांच्यासह माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे, माजी आमदार संदेश कोंडविलकर, मुंबई तेली साहू समाजाचे अध्यक्ष

अशोक साहू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

चंद्रकांत पाटलांना शरद पवारांना लगावला टोला...

भाजपमध्ये रोज नवनवीन नेते पक्ष प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये येणाऱ्यांनी विधानसभेत निवडणुकीत सहकार्य करायचे आहे. त्यामुळे जंबो पक्ष प्रवेश होतात. भाजपच्या इनकमिंगमुळे विरोधकांही प्रश्न पडला आहे. पवार म्हणतात ईव्हीएममुळे भाजप जिंकतो, पण 2004 पासून ईव्हीएम होते, पण जनतेचे काम करावे लागतात तेव्हा लोक ऐकतात, अशा शब्दात पाटील यांनी पवार यांना टोला लगावला आहे. पाच वर्षांत मोदी सरकारने जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. हा पक्ष कोणत्या घरात जन्माला आला हे पाहत नाही, प्रत्येकाला समाधान मिळेल असे काम करते, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघात टीका केली आहे.

उदयनराजे भोसले भाजपमध्ये दाखल...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले भाजपमध्ये डेरेदाखल झाले. दरम्यान, आदल्या दिवशी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालेल्या राजेंनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता.

दरम्यान, या प्रवेशानंतर उदयनराजेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले. काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचे धाडस मोदींनी दाखवले. माझ्या लहानपणापासून काश्मीरप्रश्नबद्दल ऐकत होतो, पण कोणीही त्यावर उत्तर शोधत नव्हते. पण मोदींनी ते धाडस दाखवलं, असं उदयनराजे म्हणाले. मोदी-शाहा शिवरायांच्या विचाराने कार्य करत असल्याचंही उदयनराजेंनी नमूद केले.

VIDEO:'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 06:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading