'साहेबांनी ज्यांना खासदार, आमदार, मंत्री केलं ते आता नाच्याचं काम करताय'

10 रुपयांत थाळी, पोटभर जेवण द्यायला पाच वर्षे कोणी अडवले होते का?

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 04:38 PM IST

'साहेबांनी ज्यांना खासदार, आमदार, मंत्री केलं ते आता नाच्याचं काम करताय'

वीरेंद्रसिंह उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,17 ऑक्टोबर: शरद पवार साहेबांनी ज्यांना आमदार केलं, खासदार केलं, एवढेच नाही तर मंत्रिपदही दिलं. त्यांना काहीही कमी केलं नाही, ते आता नाच्याचं काम करत आहेत, अशा शब्दांत माजी मंत्री लक्षमणराव ढोबळे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खोचक टीका केली आहे.

शिवसेनेच्या जाहीरनाम्यात उल्लेख केलेल्या 10 रुपयांत थाळी, पोटभर जेवण द्यायला पाच वर्षे कोणी अडवले होते का? 1 रुपयात आरोग्य तपासणी याच्या आधी कोणी दिली होती. अशीच झुणका भाकरीची घोषणा केली होती. झुणका गेला नदीच्या पलीकडे आणि भाकरी गेली तिकडेच, म्हणत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणा, योजनांची अजित पवार यांनी खिल्ली उडवली. हे म्हणतात कोणी पैलवान नाही त्यांचेकडे आमदार भारत भालके यांच्याकडे हात करत हा घ्या पैलवान तुम्ही पण कपडे काढा लंगोट लावा आणि खेळा कुस्ती, कसा डाव टाकून चित करतोय बघा. फक्त नुरा कुस्ती खेळू नका, म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर मंगळवेढ्यातून डाव टाकला.

भाजपला दिलं ओपन चॅलेंज!

समोर पहिलवान दिसत नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, मग पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री का महाराष्ट्रात प्रचाराला बोलावता असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. अजित पवार शिरूरमध्ये जाहीर सभेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सत्तेचा माज, मस्ती कधी केली नाही. आमच्या विचाराचे आमदार निवडून आणा 3 महिन्यात सात-बारा कोरा करून दाखवतो अशा शब्दात अजित पवार यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. शरद पवार आता कुस्ती खेळू शकत नाही अशा प्रकारची टीका भाजपकडून करण्यात आली होती. त्यावर अजित पवार यांनी भाजपचा आणि शिवसेनेलाही चोख उत्तर दिलं आहे.

Loading...

शिरुर हवेली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार चांगलेच आक्रमक झाले होते.

दरम्यान, गेल्या 2 दिवसांआधी सुप्रीया सुळे यांनीदेखील भाजप आणि शिवसेनेवर टीका केली होती. 'भारतरत्न' हे सरकारचं 'इलेक्शन गिमिक' असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. कल्याणमध्ये मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेनंतर सुप्रीया सुळे यांनी ही टीका केली होती. भाजपच्या संकल्पनाम्याची 'गाजरांचा पाऊस' म्हणूनही त्यांनी यावेळी खिल्ली उडवली.

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचा पलटवार, पाहा काय म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...