माझ्यावर अन्याय झाला असून...! एकनाथ खडसेंचं भावनिक उद्गार

ज्या पक्षाने मला मोठं केलं, मंत्रीपद दिलं त्या मायेने एकाएकी मला सोडून दिलं. मात्र, तरीही मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो असे भावनिक उद्गार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भुसावळ येथे प्रचार सभेदरम्यान बोलताना केले.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 08:31 AM IST

माझ्यावर अन्याय झाला असून...! एकनाथ खडसेंचं भावनिक उद्गार

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी

भुसावळ, 17 ऑक्टोबर : माझ्यावर अन्याय झाला असून आजही मी पक्षाला तेच विचारतोय की मी काय गुन्हा केला आहे ? ज्या पक्षाने मला मोठं केलं, मंत्रीपद दिलं त्या मायेने एकाएकी मला सोडून दिलं. मात्र, तरीही मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो असे भावनिक उद्गार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भुसावळ येथे प्रचार सभेदरम्यान बोलताना केले. भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री एकनाथ खडसे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

पाच वर्ष संजय सावकारे नाथाभाऊ यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहिले. जवळचे आमदार मात्र पळून गेले. आता नाथा भाऊ च्या मागे गेलो तर आपली ही तिकीट कापले जाईल अशी भीती त्यांना होती.  मात्र तिकीट वाटप माझ्याकडे होते.  मी महाराष्ट्राच्या पार्लमेंटरी बोर्डात असून तिकीट वाटप मला विश्वासात घेऊन च झाले असे यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.

ज्या वेळेस मला विधानसभेने निलंबित केले होते त्यावेळेस एका सभेत प्रमोद महाजन म्हणाले होते की विधानसभेत ला नाथाभाऊचा आवाज की संपूर्ण महाराष्ट्राला आवडतो आणि विधानसभेने एकनाथ खडसे यांना निलंबित केले म्हणजे '' कुंकुवा विना सुवासिनीची कल्पना सहन करता येत नाही "  तसेच नाथाभाऊ विना विधानसभा ही कल्पना मला सहन होत नसल्याचे प्रमोद महाजन हे त्यावेळी बोलताना म्हणाले होते असेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले. खरंतर यावरून एकनाथ खडसे यांनी यावेळी पक्षाने तिकीट न दिल्याने कुठेतरी मनातील खंत व्यक्त करून पक्षाला एक सुचक संदेश तर दिला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

इतर बातम्या - VIDEO: '...म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस', मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Loading...

2014 मध्ये युती तोडण्याचा राग शिवसेनेने माझा वर टाकला. मात्र हा निर्णय सामूहिक पक्षाचा होता तो निर्णय जाहीर करायला कोणी पुढे येत नव्हते मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ही धमक कोणात नव्हती म्हणून मी पुढे आलो असं एकनाथ खडसे म्हणाले. या वेळी एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्यावरही टिकास्त्र सोडलं.

राष्ट्रवादीवाले माझ्याकडे एबी फॉर्म घेऊन आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली. मात्र, अखेर राष्ट्रवादीस शिवसेनेकडून उसनवार घेतलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. आणि त्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला त्यांनी अद्याप शिवसेना सोडली नसून पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिलेला नाही अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना जे पंतप्रधानपदाचा दावा करतात त्या शरद पवारांना मुक्ताईनगर मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला एवढी दयनीय अवस्था शरद पवार यांची झाली  असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

इतर बातम्या - शरद पवारांवरील 'पैलवान' टीकेवर अजित पवार आक्रमक, भाजपला दिलं ओपन चॅलेंज!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 08:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...