काँग्रेसला खिंडार, निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता बांधणार शिवबंधन!

काँग्रेसला खिंडार, निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता बांधणार शिवबंधन!

29 सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये 4 जागांपैकी नंदूरबारच्या जागेवर उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.

  • Share this:

नंदूरबार, 01 ऑक्टोबर : ऐन विधानसभा निवडणुकांत्या तोंडावर नंदूरबारमधून काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. उत्तर महाराष्ट्रमधील काँग्रेसचे बडे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी सेनेच्या वाटेवर आहेत. गांधी परिवाराशी एकनिष्ठ कुटूंब म्हणून रघुवंशी परिवाराची ओळख आहे. गेल्या तीन टर्मपासून चंद्रकांत रघुवंशी विधानपरिषद आमदार हे बुधवारी दुपारी मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

29 सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये 4 जागांपैकी नंदूरबारच्या जागेवर उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यात चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारीचं चित्र स्पष्ट नसल्यामुळे ते शिवबंधन हाती बांधणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत रघुवंशी हे  शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. पण यासंबंधी त्यांना विचारलं असता अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याची माहिती त्यांनी दिली होती.

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात काँग्रेसकडून 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पण त्यात नंदूरबार मतदार संघाचं नाव नव्हतं. त्यामुळे नंदूरबार मतदार संघातून काँग्रेसला मोठं खिंडार पडू शकतं अशा शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, चंद्रकांत रघुवंशी यांचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असणार आहे अशी ठाम भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत रघुवंशी काय गेम करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या - भाजप पाठोपाठ शिवसेना ही मैदानात; 70 जणांची पहिली यादी जाहीर!

दरम्यान, सोमवारी श्रीरामपूर येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला होता. 'ससाणे, विखे आणि थोरातांशी गद्दारी करणाऱ्या आमदाराला पाडायचं,' असे बॅनर काही दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरात झळकले होते. त्यानंतर आता शिवसैनिकही कांबळेंच्या उमेदवारीला विरोध करताना दिसत आहेत.

गेल्या 10 वर्षापासून श्रीरामपूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत ससाणे यांनी भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आणि त्यांना श्रीरामपूरचं आमदार केलं.

इतर बातम्या - भाजपच्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 12 विद्यामान आमदारांचा पत्ता कट

2014 मध्येही पुन्हा ससाणे आणि विखेंच्या मदतीने भाऊसाहेब कांबळे श्रीरामपूर विधानसभेचे आमदार झाले. मात्र दोन वर्षांपूर्वी ससाणे गटातील अंतर्गत धुसफूसीमुळे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी नगरपालिका निवडणुकीत ससाणे गटाची साथ सोडली आणी विरोधी गटाचा हात धरला. अगोदरच आजारपणाशी लढा देत असलेल्या ससाणे यांना कांबळे यांचा हा पवित्रा अतिशय धक्का देणारा होता. तेव्हापासून ससाणे गट कुठल्याही परिस्थितीत भाऊसाहेब कांबळे यांना मदत करायला तयार नाही, असं चित्र आहे.

इतर बातम्या - शेवटच्या क्षणी गेम पलटला, दिल्लीतून गणेश नाईकांना मोठा धक्का!

विखे पाटलांच्या जवळ गेलेल्या भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसकडून विखे पाटील यांनी 2019 ची शिर्डी लोकसभेची उमेदवारीही मिळवून दिली. मात्र दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांच्या जागेच्या सुरू असलेल्या वादात विखे पाटील यांनी कांबळे यांना थांबण्याचा सल्ला दिलेला असताना त्यांनी विखेंचे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा हात धरला. कांबळे यंनी शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकही लढवली. मात्र दोन लाख मतांनी त्यांचा पराभव झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 02:37 PM IST

ताज्या बातम्या