भाजपने तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पत्रकार परिषद, घेणार मोठा निर्णय?

तिकीट नाकारल्यानंतर विनोद तावडे हे पहिल्यांदा पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे ते काय मोठा निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 10:57 AM IST

भाजपने तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पत्रकार परिषद, घेणार मोठा निर्णय?

मुंबई, 04 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने मुक्ताईनगर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत त्यांची कन्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने चौथ्या यादीत सात जागांची घोषणा केली आहे. यामध्येही एकनाथ खडसे यांच्यासह विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना स्थान देण्यात आलेलं नाही. तर कुलाबामधून रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. चौथ्या यादीमध्येही नाव नसल्यामुळे थोड्याच वेळात विनोद तावडे हे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजप कार्यालयात ते माध्यमांशी संवाद साधणार आहे.

तिकीट नाकारल्यानंतर विनोद तावडे हे पहिल्यांदा पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे ते काय मोठा निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. मात्र, चौथ्या यादीतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्चशिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची नावे न नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, विनोद तावडे यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

भाजपची चौथी यादी, कुणाला मिळाली संधी?

मुक्ताईनगर - रोहिनी खडसे

काटोल - चरणसिंह ठाकूर

Loading...

तुमसर - प्रदीप पडोले

नाशिक (पूर्व)- राहुल ढिकले

बोरिवली - सुनील राणे

घाटकोपर (पूर्वी) - पराग शाह

कुलाबा - राहुल नार्वेकर

इतर बातम्या - बापाच्या आधी मुलाचा जन्म कसं शक्य? थरूर म्हणातात, PM मोदी राष्ट्रपिता म्हणजे...

अजित पवारांनी केला खडसेंशी संपर्क?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षांतर केलं. काँग्रेसला धक्का देत राधाकृष्ण विखे पाटील बाहेर पडले तर राष्ट्रवादीतून गणेश नाईक आणि उदयनराजेंसह अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले. पण त्यानंतर आता सत्ताधारी भाजपलाच मोठं खिंडार पडू शकतं, अशी चर्चा सुरू झाली आहे.

इतर बातम्या - मनसेला धक्का, नेत्याला भाजपने जाहीर केली उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल आपला नियोजित बीड दौरा रद्द केला. त्यानंतर अजित पवार भाजपचे दिग्गज नेते आणि सध्या पक्षात नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी जळगावला रवाना झाल्याचं बोललं जात होतं. याबाबत दोन्ही पक्षांनी अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाही. मात्र जर खरोखरच एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असतील तर विधानसभा निवडणुकीना वेगळी कलाटणी मिळू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 10:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...