शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातून

शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातून

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातून होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 06 फेब्रुवारी: केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातून होणार आहे.राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जमवलेला डाटा वापरून दोन हप्ते म्हणजेच चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या ख्यात्यात जमा होणार.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने शासकीय यंत्रणेला कामाला लावले असून, जिल्ह्णातील प्रत्येक खातेधारक शेतकऱ्यांची गावपातळीवर माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.

देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार देशपातळीवर सर्वेक्षण करणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न, कर्जबाजारीपणा यासह विविध मुद्द्यांवर सध्याच्या पीक वर्षात हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या ७७व्या फेरीदरम्यान 'कृषी कुटुबांचे परिस्थिती मूल्यमापन सर्वेक्षण' केले जाणार असल्याचे शेखावत यांनी स्पष्ट केले. देशात यापूर्वी २०१२-१३ या वर्षात असे सर्वेक्षण झाले होते. नियमितपणे केलेल्या अशा सर्वेक्षणामुळे सरकारला विकासाचे प्राधान्यक्रम ठरवण्यास मदत होईल, असेही शेखावत यांनी म्हटले आहे.

-ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आनलाईन माहिती भरली त्यांच्या खात्यात लवकरच पैसै जमा होणार

-केंद्र सरकार राज्य सरकारला पैसै देणार राज्य सरकार ते पैसै शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

-हे पैसे शासकीय बँका शेतकऱ्यांच्या खात्यातून कापू शकणार नाही

-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या आधारावरच राबविली जाणार योजना

-कारण कर्जमाफी योजनेमुळे आधीच बहुतेक शेतकऱ्यांची आनलाईन माहिती सरकारकडे, त्यामुळे राज्याच्या शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागणार नाही

-ज्या राज्यांत शेतकऱ्यांच्या याद्या डिजिटल नाही तिथे वेळ लागण्याची शक्यता

First published: February 6, 2019, 9:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading