साताऱ्यामध्ये सापडले तब्बल 13 गावठी बॉम्ब, महाराष्ट्रात खळबळ

साताऱ्यामध्ये सापडले तब्बल 13 गावठी बॉम्ब, महाराष्ट्रात खळबळ

साताऱ्यात महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातल्या कवाडेवाडी इथे तब्बल 13 बॉम्ब सापडले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

सातारा, 11 नोव्हेंबर : सत्ता स्थापनेच्या तिढ्यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात साताऱ्यात महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातल्या कवाडेवाडी इथे तब्बल 13 बॉम्ब सापडले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस दलातील बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाने हे सर्व बॉम्ब निकामी केले आहेत. या प्रकरणात एक परप्रांतिय संशयिताला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कोरेगाव तालुक्यातील कवाडेवाडी इथे एका अज्ञात व्यक्तीकडे बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ बॉम्ब शोधक पथकासह डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरावर पोलिसांची शोध मोहिम सुरू झाली. संशयित आरोपी मनिबबे सुपरचंद राजपुत याची झडती घेतली. पोलिसांना त्याच्याकडून 9 गावठी बॉम्ब सापडले तर 4 तासाहून अधिक काळ बॉम्ब शोधण्याची मोहिम राबवल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार 13 गावठी बॉम्ब पोलिसांना सापडल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या - भाजपच्या 7 आमदारांचा अजित पवारांना फोन, राजकारणात मोठी खळबळ

यामध्ये सातारा पोलीस दलातील सुर्या श्वान पथकाने 4 जिवंत बॉम्ब शोधून काढले. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि श्वान पथकाच्या यशस्वी कारवाईत प्राथमिक तपासानुसार शेतातील डुक्कर मारण्यासाठी या गावठी बॉम्बचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वाठार पोलीस करीत आहेत.

दरम्यान, एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. अशा काही मोठा घातपात होऊ नये त्यामुळे आता पोलीस प्रशासन अलर्ट झालं आहे. तर नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2019 02:59 PM IST

ताज्या बातम्या