महाकौशल एक्स्प्रेसचे 8 डबे घसरले, 22 जखमी

महाकौशल एक्स्प्रेसचे 8 डबे घसरले, 22 जखमी

उत्तर प्रदेशात महोबाजवळ कुलपहाड इथे महाकौशल एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत 22 प्रवासी जखमी झाले.

  • Share this:

 

30 मार्च :  उत्तर प्रदेशात महोबाजवळ कुलपहाड इथे महाकौशल एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत 22 प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं गेलं. यापैकी 19 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

जबलपूरहून दिल्लीला ही एक्स्प्रेस जात होती. रात्री अडीच वाजेच्या सुमारास गाडीचे 8 डबे रुळावरून घसरले. या अपघातामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात अधिक माहिती अपेक्षित आहे.

गेल्या महिन्यांमध्ये देशात काही मोठे रेल्वे अपघात झाले. जानेवारीत आंध्र प्रदेशच्या विजयनगरमध्ये जगदलपूर-हिराखंड एक्स्प्रेसला अपघात झाला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कानपूरला झालेल्या रेल्वे दुर्घटनेत 150 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. एकामागून एक झालेल्या रेल्वे अपघातांमागे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचा हात होता असं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 09:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...