S M L

1 लाख प्लॅस्टिकच्या बाटल्या, 50 विद्यार्थी आणि 21 तास...असा साकारला 'महागणपती'

पाण्याच्या रिकाम्या १ लाख प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून एकलव्य क्रीडासंकुलाच्या दीड एकर क्षेत्रावर श्री गणपतीचे म्युरल तयार करण्यात आलं आहे.

Updated On: Sep 12, 2018 02:23 PM IST

1 लाख प्लॅस्टिकच्या बाटल्या, 50 विद्यार्थी आणि 21 तास...असा साकारला 'महागणपती'

जळगाव, 12 सप्टेंबर : डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाचा कार्यक्रम आणि खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने पाण्याच्या रिकाम्या १ लाख प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून एकलव्य क्रीडासंकुलाच्या दीड एकर क्षेत्रावर श्री गणपतीचे म्युरल तयार करण्यात आलं आहे. ड्रोनच्या माध्यमातून त्याचा एक सुबक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या म्युरलच्या निर्मितीसाठी 50 विद्यार्थ्यांनी अथक श्रम घेत केवळ 21 तासात हे म्युरल बनवण्यात यश मिळवलं आहे. के.सी.ई. सोसयटीच्या ओजस्विनी फाईन आर्टस्, एकलव्य क्रीडा संकुल, मुलींचे आणि मुलांचे वसतीगृह, अध्यापक विद्यालय, ओरिऑन सीबीएसई स्कूल, ओरिऑन इंग्लिश मीडियम स्कूल, ए.टी.झांबरे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यात प्लॅस्टिकच्या एक लिटरच्या एक लाख बाटल्यांचं संकलन केलं आणि हे म्युरल साकारलं आहे.

एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर श्री गणपतीचे म्युरल तयार करण्यात येणार आहे. ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरुवात केली. ५० स्वयंसेवकांनी दीड एकर क्षेत्रावर हे म्युरल तयार केलं आलं आहे.

या उपक्रमास दिल्ली येथील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि फरिदाबाद येथील एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् या संस्थांची कायदेशीर मान्यता घेण्यात आली आहे. यासाठी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून डॉ.ममता काबरा आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

 

Loading...
Loading...

घरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2018 02:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close