Mahad building collapse : अखेर बिल्डरासह 5 जणांवर गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक

Mahad building collapse : अखेर बिल्डरासह 5 जणांवर गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक

या इमारतीमध्ये 43 कुटुंब राहात होती त्यापैकी 18 कुटुंबातील लोक कोरोनामुळे गावी गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

  • Share this:

मोहन जाधव, प्रतिनिधी

महाड, 25 ऑगस्ट :  रायगड जिल्ह्यातील महाड इथे तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत  कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीला मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा मृतदेह ढिगाराखालून बाहेर काढला आहे. या दुर्घटनेप्रकरणी  5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बिल्डराचा समावेश आहे.

महाड इमारत दुर्घटनेला 12 तास उलटत नाही तेच प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत  तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि Rcc कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहे.  बिल्डरला अटक करण्यासाठी महाडमधून पथक रवाना झाले आहे.

नागपूरमधून धक्कादायक बातमी, तुकाराम मुंढेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

दरम्यान, घटनास्थळी 12 तासांपासून पोलीस, एनडीआरएफच्या मदतीनं मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची माहिती मिळली होती. त्यानुसार मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ढिगाऱ्यात पहिला मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह गॅस कटरने स्लॅब कापून काढण्यात आला आहे.

बचाव पथकाने जेसीबीच्या मदतीनं 8 जणांना ढिगाऱ्याखालून काढलं. जखमींना स्थानिक रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. या इमारतीचा पहिला पिलर खचला तेंव्हा बहुतांश तरुण इमारतीच्या बाहेर पडले अशीही प्राथमिक माहिती मिळाली आहे.

महाड इमारत दुर्घटना प्रकरण, 12 तासांनंतरही कसं सुरू आहे बचावकार्य पाहा PHOTOS

या इमारतीमध्ये 43 कुटुंब राहात होती त्यापैकी 18 कुटुंबातील लोक कोरोनामुळे गावी गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करून नुकसानभरपाई तात्काळ देण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे. सध्या NDRF आणि पोलिसांकडून मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे दुर्घटनास्थळी मदतकार्यात अडथळा येत असतानाही बचाव कार्य गतीने सुरू ठेवण्याचे यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Published by: sachin Salve
First published: August 25, 2020, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading