स्वतःपेक्षा 13 वर्षांनी लहान व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये होती 'द्रौपदी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री

स्वतःपेक्षा 13 वर्षांनी लहान व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये होती 'द्रौपदी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री

रुपा गांगुलीनं पतीसाठी तिचं करिअर सोडून दिलं होतं आणि ती कोलकाताला शिफ्ट झाली होती. त्यानंतर ती एक हाऊसवाइफचं लाइफ जगत होती.

  • Share this:

मुंबई, 24 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. ज्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही पडला अनेक मालिकांचं शूटिंग बंद झाल्यानं नवे एपिसोड बंद झाले. अशात डीडी नॅशनलवर रामायण आणि महाभारत या मालिकांचं रि-टेलिकास्ट सुरू करण्यात आलं. ज्यामुळे या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार अचानक चर्चेत आले. अशात महाभारतात द्रौपदीची भूमिका साकाणारी अभिनेत्री रुपा गांगुली ही सुद्धा तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे.

महाभारत मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुली तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच अनेकदा तिच्या खासगी लाइफमुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. रुपा गांगुलीनं तिच्या खासगी आयुष्यात आतापर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत. अनेक समस्यांना तोंड दिलं आहे. 1992 मध्ये रुपा गांगुलीनं ध्रुबो मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. सुरवातीला यांच्या नात्यात सर्वकाही ठीक होतं. या दोघांना एक मुलगा सुद्धा झाला. पण मुलाच्या जन्मानंतर त्याच्यामध्ये मतभेदांना सुरुवात झाली. लग्नाच्या 14 वर्षांनंतर म्हणजेच 2007 मध्ये हे दोघंही वेगळे झाले आणि 2009 मध्ये या दोघांनी ऑफिशिअली घटस्फोट घेतला.

रुपा गांगुलीनं पतीसाठी तिचं करिअर सोडून दिलं होतं आणि ती कोलकाताला शिफ्ट झाली होती. त्यानंतर ती एक हाऊसवाइफचं लाइफ जगत होती. मात्र तिचा पती तिला रोजच्या खर्चासाठी पैसे मिळत नव्हते. त्यामुळे रोज होत याअसलेल्या भांडणाला कंटाळून रूपा गांगुलीने तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

हिंदू प्रियकर अन् मुस्लीम प्रेयसी, आईवडिलांचा विरोध झुगारून केलं शुभमंगल!

ध्रुबो मुखर्जीपासून घटस्फोट घेतल्यावर रूपा स्वतःपेक्षा 13 वर्षांनी लहान असलेला गायक बॉयफ्रेंड दिब्येंदु सोबत मुंबईत तिच्या फ्लॅटवर राहत होती. पुढे जाऊन तिने दिब्येंदु सोबतही नातं तोडलं. मात्र जेव्हा ती दिब्येंदुसोबत राहत होती त्यावेळी तिचा घटस्फोट झाला नव्हता. रिअलिटी शो सच का सामना (2009)मध्ये तिनं तिच्या खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले.

रुपा गांगुलीनं महाभारत व्यतिरिक्त बॉलिवूड सिनेमा 'साहेब' (1985), 'एक दिन अचानक' (1989), 'प्यार के देवता' (1990), 'बहार आने तक' (1990), 'सौगंध' (1991), 'निश्चय' (1992) आणि 'बर्फी' (2012)या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

सुनिधी चौहानचा 8 वर्षांचा संसार मोडला? नवरा म्हणतो, 'आम्ही दोघंही...'

First published: April 24, 2020, 3:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या