'महा'वादळाचा जोर ओसरला, तरीही या भागांना सतर्कतेचा इशारा

महा चक्रीवादळ हे विध्वंसक स्वरुपाचं होतं. पण त्याचा आता जोर ओसरल्यानं तितकासा फटका गुजरात आणि महाराष्ट्राला बसणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 08:12 PM IST

'महा'वादळाचा जोर ओसरला, तरीही या भागांना सतर्कतेचा इशारा

स्वाती लोखंडे, प्रतिनिधी

मुंबई, 06 नोव्हेंबर : 'महा'चक्रीवादळाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार आणि पालघर भागात आता मुसळधार ऐवजी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाउस होणार आहे. जसेजसे महाचक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकेल तसतसा त्याचा जोर ओसरताना बघायला मिळतो आहे. उद्या मात्र दुपारी गुजरातच्या दिवपासून 40 किमी अंतरावरून हे चक्रीवादळ पुढे सरकेल. तेव्हा त्याचा जोर आणखी ओसरलेला असेल असा अंदाज हावामान विभागानं वर्तवला आहे.

महा चक्रीवादळ हे विध्वंसक स्वरुपाचं होतं. पण त्याचा आता जोर ओसरल्यानं तितकासा फटका गुजरात आणि महाराष्ट्राला बसणार नाही. पण मच्छिमारांसाठी मात्र समुद्रात न जाण्याचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. महा चक्रीवादळाचा जोर ओसरला असला तरी मच्छिमारांना समुद्रात जाउ न देण्याचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. मच्छिमारी हा एकमेव उदरनिर्वाहाचं साधनं असल्याने कधी वादळ, कधी पाउस, तर कधी चक्रीवादळ यामुळे मासेमारी करणारा त्रस्त झाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई महत्त्वाची आहे.

महा वादळामुळे लाटांवर हेलकावे खात अशा शेकडो बोटी सध्या महाराष्ट्रातील बंदरावर, किनाऱ्यावर नांगर टाकुन उभ्या आहेत. या वादळानं मासेमारी ठप्प झाली आहे. पर्यायानं कोळ्यांचा उदरनिर्वाहही. मायबाप शेतकऱ्याची विचारपुस केली जातेय. पण मग कोळ्याचं काय. शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसानाचा पंचनामा केला जातो. पण कोळ्यांचा नुकसानाकडे साधं बघितलंही जात नाही असा आरोप मच्छिमारांकडून केला जात आहे.

दरम्यान, पुण्यात आलेल्या पुराने आंबील ओढ्याच्या कडेला असलेल्या अनेक वस्त्यंमधले संपूर्ण संसार वाहून गेले आहेत. प्रशासानाने तातडीने पंचनामे तर केलेच नाही. मात्र पहिल्या दोन दिवसांत द्यायची मदत सुमारे महिनाभराने दिली गेली. बरं मदत दिलीय तर ती देताना भरपूर प्रशासकीय भंपकपणा ही करून ठेवलाय. मदतीचे चेक मिळालेल्या अनेक नागरिकांना अगदी 2017च्या तारखेचे चेक देण्यापासून ते दुसऱ्याच सह्यांवर चेक वाटप केल्याचे प्रकार उघड झालं आहे. आता पुन्हा हे मदतीचे हे चेक दुरूस्त करून घेण्यासाठी खेटे मारण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे.

Loading...

'महा'चा परिणाम

6 नोव्हेंबरला मध्यरात्री किंवा 7 नोव्हेंबरला पहाटे हे वादळ गुजरात किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे. दीवचा समुद्रकिनारा आणि गुजरातच्या पोरबंदर बंदराच्या दरम्यान हे वादळ जमिनीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत हे वादळ आणखी तीव्र होईल आणि त्यानंतर त्याचा जोर थोडा कमी होत जाईल. या वादळाच्या प्रभावाने ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहतील. ताशी 120 किमीपर्यंत वादळाचा जोर वाढू शकतो. या संपूर्ण काळात समुद्र खवळलेला असेल. पुढचे तीन दिवस समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यातही इशारा

5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान पुणे शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह ,विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 6 नोव्हेंबरला 25 ते 35 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असंही हवामानात विभागाचे अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे. 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान पावसाची तीव्रता कमी होईल मात्र ढगाळ वातावरण राहील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: IMDweather
First Published: Nov 6, 2019 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...