आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, विदर्भाला झुकतं माप?

आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, विदर्भाला झुकतं माप?

राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही बिकट परिस्थिती असताना केवळ आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यात विदर्भातल्या 6 तालुक्यांचा समावेश केल्यानं राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई,ता.25 एप्रिल: राज्य सरकार ने राज्यातील 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय. यात विदर्भातील 6 आणि उत्तर महाराष्ट्रातल्या दोन तालुक्यांचा समावेश आहे. अपुरा पाऊस आणि इतर सर्व घटकांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं सरकारनं जाहीर केलंय.

राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही बिकट परिस्थिती असताना केवळ आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यात विदर्भातल्या 6 तालुक्यांचा समावेश केल्यानं राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील निम्मे तालुके, धुळे, नंदुरबार, विदर्भात अकोला, बुलढाणा या तालुक्यांमधल्या गावांची आणेवारी पन्नास पैशा पेक्षा कमी आहे, पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्ष आहे असं असताना राज्यातील निवडक तालुकेच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात का आले असा सवाल आता विचारण्यात येतोय.

हे आहेत दुष्काळग्रस्त तालुके

यवतमाळ - यवतमाळ, राळेगाव, घाटंजी, दिग्रस आणि केळापूर

वाशिम - वाशिम

जळगाव - बोदवड आणि मुक्ताईनगर

First published: April 25, 2018, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading