मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /WhatsApp ग्रुपवर सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या डॉक्टरांवर सायबर सेलची नजर

WhatsApp ग्रुपवर सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या डॉक्टरांवर सायबर सेलची नजर

व्हॉट्सअ‍ॅपच्या या वैशिष्ट्यासह वापरकर्ते यूआरएल लिंक किंवा क्यूआर कोड तयार करू शकतात. त्यामुळे, कोणालाही नंबर न विचारता किंवा नंबर सेव्ह न करता लिंक किंवा कोड वापरून त्यांच्याशी संपर्क साधू शकता.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या वैशिष्ट्यासह वापरकर्ते यूआरएल लिंक किंवा क्यूआर कोड तयार करू शकतात. त्यामुळे, कोणालाही नंबर न विचारता किंवा नंबर सेव्ह न करता लिंक किंवा कोड वापरून त्यांच्याशी संपर्क साधू शकता.

काही डॉक्टरांच्या WhatsApp ग्रुपवर सरकारविरोधी प्रतिक्रिया येत असल्याची तक्रार महाराष्ट्र सायबर सेलने केल्यानंतर महाराष्ट्र IMA ने सरकारविरोधी भूमिका न घेण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्यात.

राधिका रामास्वामी, मुंबई, 21 एप्रिल : राज्यातील डॉक्टरांच्या व्हॉट्स ग्रुपवर (doctors WhatsApp) सरकारविरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत आणि अशा ग्रुपवर राज्याच्या सायबर सेलची (cyber cell) नजर आहे. महाराष्ट्र सायबर सेलने महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनकडे (IMA) कडे तक्रार केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र आयएमएने डॉक्टरांना सरकारविरोधी भूमिका न घेण्याच्या सूचना केल्यात.

काही डॉक्टरांच्या व्हॉट्स ग्रुपवर सरकारच्या विरोधात मेसेज येत असल्याची तक्रार महाराष्ट्र सायबर सेलने केल्यानंतर महाराष्ट्र आयएमएने राज्यातील सर्व डॉक्टरांना पत्र दिलं आहे. हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती आलं आहे.

हे वाचा - लॉकडाऊनमध्ये वाढली चाईल्ड पॉर्नोग्राफी, महाराष्ट्रात 133 गुन्हे दाखल, 46 अटक

या पत्रात नमूद केल्यानुसार, "महाराष्ट्र सायबर सेलच्या एका अधिकाऱ्याकडून आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, डॉक्टरांच्या काही व्हॉट्स अॅप ग्रुपवर महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या अधिकाऱ्याविरोधात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सायबर सेलनं IMA ला याबाबत खबरदारी घेण्यास सांगितलं आहे"

याबाबत न्यूज 18 लोकमतशी बोलताना महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "सरकार आणि डॉक्टरांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. डॉक्टरांची भूमिका सरकारविरोधी नाही. सध्या अशी परिस्थिती आहे, ज्यामध्ये सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही डॉक्टरांच्या अंतर्गत बैठकीत खबरदारी म्हणून फक्त त्यांना अशा सूचना केल्यात की, व्हॉट्सअप ग्रुप हा चर्चेसाठी आणि सल्ल्यासाठी असावा, अशा चुकीच्या प्रतिक्रिया देऊ नयेत"

संपादन - प्रिया लाड

हे वाचा - डॉक्टर दाम्पत्याला सलाम, काळजाच्या तुकड्याला कुलुपबंद करून जावं लागतं रुग्णालयात

First published: