भारताचा उसेन बोल्ट! अनवाणी धावत पूर्ण केली 100 मीटरची शर्यत, पाहा VIDEO

भारताचा उसेन बोल्ट! अनवाणी धावत पूर्ण केली 100 मीटरची शर्यत, पाहा VIDEO

प्रशिक्षण आणि चांगल्या सुविधा मिळाल्या तर हा तरुण विश्वविक्रम मोडेल असं मत क्रीडा मंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 17 ऑगस्ट : जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला वेगाचा बादशहा म्हटलं जातं. 100 मीटरमध्ये सर्वात कमी वेळेची नोंद करण्याचा विक्रम बोल्टच्या नावावर आहे. आता भारताचा उसेन बोल्ट म्हणून मध्य प्रदेशातील एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पायात बूट, चप्पल काहीही न घालता 100 मीटर शर्यत 11 सेकंदात पूर्ण करणारा हा व्हिडिओ सध्या शेअर होत आहे.

क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही हा व्हिडिओ शेअर करत तरुणाला अॅथलेटिक्स अॅकॅडमीत प्रवेश देण्याचं आश्वासन दिलं आहे. मध्य प्रदेशातील त्या तरुणाचं नाव रामेश्वर गुर्जर असं आहे. 19 वर्षांचा असलेला रामेश्वर शिवपुरीतील एका शेतकरी कुटुंबातला आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी रामेश्वरचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, भारताकडे प्रतिभावान खेळाडूंची कमी नाही. त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळालं तर इतिहास घडवू शकतात. किरण रिजिजू यांना विनंती आहे की या तरुण खेळाडूच्या कौशल्यात भर पडावी यासाठी मदत करावी. याशिवाय राज्याच्या क्रीडा मंत्री जीतू पटवारी यांनी रामेश्वर गुर्जरचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, योग्य प्रशिक्षण आणि सोयीसुविधा मिळाल्या तर तो 100 मीटरची शर्यत 9 सेकंदात पूर्ण करू शकतो.

सर्वात वेगवान 100 मीटर शर्यत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय विक्रम अमिया मलिकच्या नावावर आहे. त्याने 10.26 सेकंदात शर्यंत पूर्ण केली होती. 100 मीटरची शर्यत सर्वात कमी वेळेत पूर्ण करण्याचा विश्वविक्रम जमैकन धावपटू उसेन बोल्टच्या नावावर आहे. त्यानं 9.58 सेकंदात शर्यत पूर्ण केली होती.

SPECIAL REPORT: पुण्याकडे जाणारा सगळ्यात जवळचा रस्ता वाहतुकीसाठी बंद, व्यवसायासह पर्यटनाला फटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: athletes
First Published: Aug 17, 2019 10:50 AM IST

ताज्या बातम्या