मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

वृद्धानं आजारी पत्नीसाठी घराचं केलं ICU, अशी घेतात आपल्या बायकोची काळजी

वृद्धानं आजारी पत्नीसाठी घराचं केलं ICU, अशी घेतात आपल्या बायकोची काळजी

हे फोटो आणि या वृद्ध व्यक्तीचं आपल्या पत्नीवर असणारं प्रेम पाहून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.

हे फोटो आणि या वृद्ध व्यक्तीचं आपल्या पत्नीवर असणारं प्रेम पाहून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.

हे फोटो आणि या वृद्ध व्यक्तीचं आपल्या पत्नीवर असणारं प्रेम पाहून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 11 ऑक्टोबर : प्रेम ही अशी भावना जी व्यक्त करण्यासाठी काही वेळा शब्दही अपुरे पडतात. कधी ती कृतीतून तर कधी नकळत प्रत्येक गोष्टीत अप्रत्यक्षपणे पण व्यक्त होत राहाते. एकमेकांप्रती निखळ प्रेम आणि काळजी असं सुंदर नातं असतं. एकमेकांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जपणं असतं आणि तेच एका वृद्ध व्यक्तीनं केलं आहे. आपली पत्नी खूप आजारी असल्यानं तिला रुग्णालयात एकटीला न ठेवतानं या वृद्ध व्यक्तीनं घरीच अख्ख ICU उभं केलं आणि आपल्या डोळ्यासमोर स्वत:ची सगळी काळजी घेत आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये राहणाऱ्या रियार्ड इंजिनियर ज्ञान प्रकाश यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी आपल्या पत्नीसाठी घराचं ICU केलं आहे. पत्नीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी या घरात उपलब्ध केल्या आहेत. इथे ना डॉक्टरांचा रतीब आणि ना नर्सचा सगळं ते एकटेच करतात. घरातल्या सिलेंडरपासून ते वेंटिलेटरपर्यंत सगळं ते एकटेच सांभाळतात. आपल्या पत्नीची साथ शेवटच्या श्वासापर्यंत देण्याचं वचन ते पाळत आहेत.

कुमुदिनी श्रीवास्तव यांना अस्थमाचा त्रास आहे. त्यांचं वय 72 वर्ष आहे. गेल्या 4 वर्षांपासून त्या खूप आजारी असतात. त्यांना मागच्या वर्षी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सतत रुग्णालयाचे खेटे घालायला लागू नयेत म्हणून ज्ञान प्रकाश यांनी घरातच ICUच्या सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या. घरचं स्वरुप बदलून रुग्णालय केलं. त्यांनी आपल्या पत्नीसाठी ऑक्सिजन गॅसची वेगळी पाईपलाईन तयार करून घेतली. त्यांची ही कहाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर युझर्सनी त्यांच्या प्रेमाला सलाम करत त्यांची पत्नी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.

First published: