Home /News /news /

Agnipath Scheme : तरूणांना चिथावणी देणाऱ्या माजी सैनिकाला बेड्या, CCTV मध्ये सापडला पुरावा

Agnipath Scheme : तरूणांना चिथावणी देणाऱ्या माजी सैनिकाला बेड्या, CCTV मध्ये सापडला पुरावा

सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) अनेक राज्यातून हिंसक विरोध झाला आहे. या विरोधासाठी तरूणांना चिथावणी देणारे चेहरे आता उघड होत आहेत.

    मुंबई, 19 जून : सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) अनेक राज्यातून हिंसक विरोध झाला आहे. या विरोधासाठी तरूणांना चिथावणी देणारे चेहरे आता उघड होत आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाहलेरमध्ये या प्रकरणात पोलिसांनी माजी सैनिकाला अटक केली आहे. मनोज असं या सैनिकाचं नाव असून तो फिजिकल ट्रेनर आहे. मनोजनं अग्निपथ योजनेच्या विरोधात तरूणांना भडकावलं आणि त्यानंतर त्यांना गोला मंदिरामध्ये एकत्र येण्याची सूचना केली होती. या आंदोलनाच्या दरम्यान मनोज तिथं उपस्थित असल्याचे पुरावे सीसीटीव्हीमध्ये सापडले होते. या पुराव्याच्या आधारावर त्याच्यावर एफआयआयर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधा ग्वाहलेरमध्ये गुरूवारी हजारो तरूणांनी आंदोलन केलं. या तरूणांनी सुरूवातीला गोला मंदिरामध्ये प्रदर्शन केलं. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर जाऊन तोडफोड आणि जाळपोळ केली. जिल्ह्यातील काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तरूणांना चुकीची माहिती देऊन एकत्र येण्याची सूचना देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून जिल्ह्यातील सर्व फिजिकल क्लब कोणत्याही परवानगी शिवाय सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत. या क्लबला विभागीय एसडीएम कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे. फिजिकल क्लबचे संचालक आणि त्यामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा या आंदोलनात सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार देणार अग्निवीरांना खास सवलत, 4 वर्षानंतर होणार अनेक फायदे हवाई दल देणार सवलत अग्निवीरांना सवलत देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह हवाई दल देखील सरसावलं आहे.चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातील, ज्या कायमस्वरूपी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांनुसार असतील. वायुसेनेच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, पगारासह अग्निवीरांना हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळतील. या सुविधा नियमित सैनिकाला मिळतात. अग्निवीरांना सेवा कालावधीत प्रवास भत्ताही मिळेल. याशिवाय त्यांना वर्षातून ३० दिवसांची रजा मिळणार आहे. त्यांच्यासाठी वैद्यकीय रजेची व्यवस्था वेगळी आहे. अग्निवीरांना सीएसडी कॅन्टीनची सुविधाही मिळणार आहे. सेवेदरम्यान (चार वर्षे) दुर्दैवाने अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल. याअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपये मिळणार आहेत.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Indian army, Madhya pradesh, Protest, Scheme

    पुढील बातम्या