मध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त

मध्यप्रदेश निवडणुकीत पैशांचा खेळ, 500 कोटींचं हवाला रॅकेट उद्धस्त

राज्यात 17 ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. कागदपत्रांच्या तपासणीचं काम सुरू असून आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेट उद्धस्त करण्यात विभागाला यश आलंय.

  • Share this:

अनुराग श्रीवास्तव, भोपाळ, ता.13 नोव्हेंबर : निवडणूक आणि पैसे हे समिकरण कायम जुळलेलं असतं. राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसा पाहिजे आणि पैश्यासाठी निवडणुका जिंकायच्या असतात. निवडणुक आयोगाच्या नियमानुसार खर्च करणं हे कुठल्याच पक्षांना शक्य होत नाही. निवडणुका जिंकायच्या असतील तर त्यासाठी पैसा पाहिजे असतो. हा पैसे स्वच्छ मार्गाने आणला जात नाही. त्यासाठी निवडला जातो 'हवाल्या'चा मार्ग. याच अवैध मार्गाने मध्यप्रदेशात 500 कोटी रूपये आल्याचा अंदाज आयकर विभागानं व्यक्त केलाय. राज्यात 17 ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. कागदपत्रांच्या तपासणीचं काम सुरू असून आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेट उद्धस्त करण्यात विभागाला यश आलंय.


राज्यात हवाला मार्गाने पैसे आल्याची माहिती मिळताच आयकर विभागाने मध्यप्रदेशातल्या 17 ठिकाणी धाडी टाकल्या आणि तसापणी सुरू केली. यात जबलपूर मधल्या एका फर्म जवळ 60 लाखांची रोकड सापडली असून त्याचा कुठलाही हिशेब त्यांना देता आला नाही.


तर इंदूरमधल्या एका फर्मकडे 60 कोटींची बनावट बिलं आढळून आली आहेत. कुठलीही खरेदी विक्री न करता ही बिलं तयार करण्यात आली होती.आयकर विभाग याची चौकशी करत असून आत्तापर्यंत 13 कोटींची अघोषीत संपत्ती सापडली आहे. निवडणुकीत वापरण्यासाठी हा पैसा अवैध मार्गानं राज्यात आला आहे.


आयकर विभागाच्या या चौकशीत अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. निवडणुक आयोगानेही या कारवाईची दखल घेतली आहे. तर निवडणूक आयोगाच्या कारवाईतही आत्तापर्यंत साडेचार कोटीची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.


नोटबंदीनंतर सर्व काळा पैसा हा बँकेत जमा झाला होता. त्यामुळं पैशाची चणचण भासू लागली. मात्र गेल्या दोन वर्षात दोन हजारांच्या नोटांच्या माध्यमातून पैसा दडवून ठेवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून निवडणुकी दरम्यान त्याचा वापर होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.


 


 


 

VIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 08:17 PM IST

ताज्या बातम्या