दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पार्टी.. पतीच्या मित्रांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पार्टी.. पतीच्या मित्रांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पीडितेच्या पतीने मित्रांना घरी पार्टीसाठी बोलावले होते.

  • Share this:

विदिशा,31 ऑक्टोबर: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पार्टीसाठी आलेल्या पतीच्या मित्रांनी 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर नराधमांनी मित्राची म्हणजेच पीडितेच्या पतीची गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात केली. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात आलमपूर गावात घडली.

मिळालेली माहिती अशी की, विवाहितेवर तिच्या पतीच्या दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पतीने मित्रांना घरी पार्टीसाठी बोलावले होते. दारू प्यायल्यानंतर आरोपी सुनील कुशवाहा आणि मनोज अहिरवार यांनी विविहितेला महिलेला घराच्या मागच्या बाजून ओढले. तिला वाचवण्यासाठी पती धावून आला. मात्र, दोघांनी त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना बुधवारी अटक केली आहे. त्यांच्यावर हत्या आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या रुग्णालयातून त्या रुग्णालयात माराव्या लागल्या चकरा..

अत्यंत शरमेची बाब म्हणजे पतीच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी आणि स्वतःची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पीडितेला या रुग्णालयातून त्या रुग्णालयात चकरा माराव्या लागल्या. धक्कादायक म्हणजे रुग्णालयांत डॉक्टर नसल्याने पीडितेला तब्बल 100 किलोमीटर प्रवास करावा लागला. सिरोंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन तास वाट पाहिल्यानंतरही डॉक्टर आले नाहीत. त्यामुळे पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी लातेरीहून 80 किमीवर असलेल्या बासोदा येथे नेण्यात आले. महिलेच्या डोळ्यांवर आणि शरीरावर जखमा होत्या. पीडितेचा 12 वर्षांचा मुलगा या घटनेतील प्रमुख साक्षीदार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

First published: October 31, 2019, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading