मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मध्यप्रदेश काँग्रेसचं अजब फर्मान, तिकीट पहिजे असेल तर 'नॅशनल हेराल्ड' चं सदस्य व्हा !

मध्यप्रदेश काँग्रेसचं अजब फर्मान, तिकीट पहिजे असेल तर 'नॅशनल हेराल्ड' चं सदस्य व्हा !

तिकीट इच्काँछुकांसाठी ग्रेसनं एक अट टाकली असून ज्यांना तिकीट पाहिजे त्यांनी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या 'नॅशनल हेराल्ड' सदस्यत्व घेण्याची अट घातली आहे.

तिकीट इच्काँछुकांसाठी ग्रेसनं एक अट टाकली असून ज्यांना तिकीट पाहिजे त्यांनी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या 'नॅशनल हेराल्ड' सदस्यत्व घेण्याची अट घातली आहे.

तिकीट इच्काँछुकांसाठी ग्रेसनं एक अट टाकली असून ज्यांना तिकीट पाहिजे त्यांनी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या 'नॅशनल हेराल्ड' सदस्यत्व घेण्याची अट घातली आहे.

मकरंद काळे, भोपाळ,ता.24 जुलै : मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूकीला अजुन चार महिने अवकाश आहे. मात्र आत्तापासूनच काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढली असून तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. विधानसभेच्या 230 जागांसाठी 3200 इच्छुकांनी अर्ज केल्याची माहिती समोर आलीय. तिकीटासाठी इच्छुकांची चढाओढ लक्षात असल्याची संधी साधत काँग्रेसनं एक अट टाकली असून ज्यांना तिकीट पाहिजे त्यांनी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या 'नॅशनल हेराल्ड' सदस्यत्व घेण्याची अट घातली आहे.मध्यप्रदेशात गेली तीन टर्म सत्तेत असलेल्या शिवराजसिंग चौहान सरकारविरूद्ध लोकांमध्ये नाराजी आहे. सतत 15 वर्ष कारभार केल्यामुळे राज्य सरकारला अँटीइन्कबंसीचा सामना करावा लगातो. त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये तिकीट इच्छकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

Maratha Reservation : काँग्रेस खोटारडी, आरक्षणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न - तावडे

Maratha Reservation : हा आहे 69 टक्के आरक्षणाचा 'तामिळनाडू पॅटर्न'

प्रत्येक एका जागेसाठी 13 जणांनी अर्ज केल्यानं उमेदवारांची निवड करताना नेत्यांची दमछाक होणार आहे.राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वीच कमलनाथ यांची प्रदेशाध्यक्षपदी तर खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रचार प्रमुख म्हणून निवड केली त्यामुळं मरगळ आलेल्या पक्षात थोडी जान आली. अजुन निवडणूकींच्या तारखांची घोषणाही झाली नाही, घोषणा झाल्यानंतर इच्छुकांची गर्दी आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त होतोय.

हीच संधी साधत पक्षानं इच्छुक उमेदवारांसाठी एक फर्मान काढलंय.

नारायण राणेंच्या पत्नीविरोधात अटक वाॅरंट जारी

माओवाद्यांच्या गडात पोहोचली 20 हजार जिवंत काडतूसं,दिल्लीत दुसरी रसद पकडली

ज्यांना तिकीट पाहिजे त्यांनी काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या 'नॅशनल हेरॉल्ड'चं सदस्यत्व घेतलं पाहिजे अशी अट घातली आहे. 2000 रूपयांचा डिमांड ड्राफ्ट काढून इच्छुकांना सदस्यत्व बंधनकारक केल्याने जोरदार चर्चा सुरू झालीय. दिर्घकाळ सत्तेतून बाहेर राहिल्याने पक्षाकडे निधीची चणचण आहे. त्यामुळे या मार्गाने ती दरी भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं अंदाज व्यक्त करण्यात येतोय. 'नॅशनल हेरॉल्ड' हे मुखपत्र फारसं चालत नाही. त्याचं सर्क्युलेशनही फारसं नाही. 'नॅशनल हेरॉल्ड'च्या मालकीवरून भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी कोर्टात केस टाकली असून त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मोतीलाल व्होरा यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे. मात्र ही मागणी कोर्टानं फेटाळून लावली असली तरी तपासाचा ससेमीरा कायम आहे.

First published:

Tags: Congress, Jyotiraditya scindia, Madhya pradesh, National herald, ज्योतिरादित्य सिंधिया, निवडणूक, मध्यप्रदेश