S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कारने दिलेल्या धडकेत उंचावर उडाली विद्यार्थीनी, पण...!
  • VIDEO : कारने दिलेल्या धडकेत उंचावर उडाली विद्यार्थीनी, पण...!

    Published On: Aug 18, 2018 02:05 PM IST | Updated On: Aug 18, 2018 02:05 PM IST

    18 ऑगस्ट : मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील 12वीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीला मागून येणाऱ्या भरधाव कारने जोरात धडक दिली. ही विद्यार्थीनी कॉलेजमध्ये जाण्यासाठी सायकलवरून जात होती. अशात भरधाव वेगात येत असलेल्या कारने तिला धडक दिली आणि ती कारच्या वर जोरात आदळून जमिनीवर कोसळली. पण चमत्कार म्हणजे या भीषण अपघातात ही विद्यार्थीनी बचावली आहे. तेजल असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर तिची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या कारचालकाला पकडण्यासाठी तेजलच्या कुटुंबियांनी हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close