VIDEO : तब्बल 12 तासानंतर 'डर'चा 'दी एण्ड',मुंबईच्या माॅडेलची सुटका

VIDEO : तब्बल 12 तासानंतर 'डर'चा 'दी एण्ड',मुंबईच्या माॅडेलची सुटका

भोपाळमध्ये रोहित सिंह नावाच्या या माथेफिरूने मुंबईच्या एका मॉडेलला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील तिच्याचघरात बंदी करून ठेवले होते.

  • Share this:

भोपाळ, 13 जुलै : लग्नासाठी एका माथेफिरू तरुणाने मुंबईतील माॅडेलला तिच्याच घरात बंदी करून ठेवलं होतं अखेर 12 तासांनंतर पोलिसांनी या माथेफिरू तरुणाच्या तावडीतून माॅडेलची सुटका केलीये. तब्बल 12 तास हा हायहोल्टेज ड्रामा सुरू होता. पोलिसांनी या माथेफिरू तरुणाला ताब्यात घेतलंय.

आंबे वक्तव्य भोवलं, संभाजी भिडे दोषी !

भोपाळमध्ये रोहित सिंह नावाच्या या माथेफिरूने मुंबईच्या एका मॉडेलला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील तिच्याचघरात बंदी करून ठेवले होते.त्याने या मॉडेलला त्याच्या घरात बांधून ठेवलं. ही युवती BSNLच्या निवृत्त एजीएमची मुलगी आहे.  रोहित हा या युवतीला आधीपासूनच ओळखतो आणि गेल्या अनेक दिवसांपासून तो तिला लग्नासाठी जबरदस्ती करत आहे. पण युवतीचा नकार असल्यामुळे तिच्यावर दबाव टाकत तिला त्याने त्याच्या घरात कैद करून ठेवलं होते. त्याच्याकडे एक पिस्तुल आणि कात्री होती.  सुरुवातीला माॅडेलला बंदी केल्यानंतर त्याने फेसबुकवर व्हिडिओ लाईव्ह करून पोलिसांना याची माहिती दिली. आणि पोलिसांनी जर घरात येण्याचा प्रयत्न केला तर मी स्वत:ला गोळी जाडून घेईन अशी धमकी रोहितने दिली.

चोराचा प्रामाणिकपणा, दागिने परत करून मागितली माफी

पोलिसांवर केला हल्ला

पोलिसांनी घटनास्थळी धावून घेऊन वाटाघाटी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण माथेफिरू तरुणाने एका पोलिसावर कात्रीने हल्ला करून हाताला इजा केली.  या तरुणाने पोलिसांकडे एक ब्राँड पेपरही मागून घेतला होता. एसपीने त्याला तरुणीसोबत लग्न करून देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर तरुणाने खाली येण्यास तयारी दर्शवली.

महाराष्ट्राच्या भूगोलाला गुजरातची पाने? राष्ट्रवादीचा हल्लाबोल

आधीही असंच कृत्य केलं होतं

पोलिसांनी रोहितबद्दल मिळवलेल्या माहितीनुसार, रोहित हा अलीगडचा राहणारा आहे. त्याने याआधीही असा प्रकार केला आहे.रोहितसुद्धा मुंबईला मॉडलिंग करतो. त्याच्या या कृत्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण ओळखीच्या जोरावर त्याला सोडण्यात आलं.

First published: July 13, 2018, 7:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading