मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

वरिष्ठ पोलीस अधिकारी सापडला दुसऱ्या महिलेसोबत, घरी आल्यावर पत्नीलाच केली मारहाण, VIDEO व्हायरल

वरिष्ठ पोलीस अधिकारी सापडला दुसऱ्या महिलेसोबत, घरी आल्यावर पत्नीलाच केली मारहाण, VIDEO व्हायरल

पुरुषोत्तम शर्मा यांना एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत त्यांच्या पत्नीने रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.

    मनोज राठोड, प्रतिनिधी भोपाळ, 28 सप्टेंबर :  मध्य प्रदेश (Madhya Pradesh) लोक अभियोजनचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा (Purushottam Sharma) यांनी आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी असून आपल्याच पत्नीला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळे मध्य प्रदेश पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पुरुषोत्तम शर्मा यांनी या व्हिडिओमध्ये आपल्या पत्नीला धमकी देत बेदम मारहाण केली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण आता गृहमंत्री, मुख्यसचिव आणि डीजीपी यांच्याकडे पोहोचले आहे. त्यांचा मुलगा  पार्थ गौतम शर्मा यांनी याबद्दल  गृहमंत्री, मुख्यसचिव आणि डीजीपी यांच्याकडे केली आहे. पुरुषोत्तम शर्मा यांना एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत त्यांच्या पत्नीने रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर घरी येऊन पुरुषोत्तम शर्मा यांनी पत्नीला बेदम मारहाण केली. या व्हिडिओमध्ये त्यांच्या पत्नीने आपल्या डोक्याला आणि चेहऱ्यावर मारहाण केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या घरी असलेल्या कर्मचाऱ्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही पुरुषोत्तम शर्मा यांनी पत्नीला बेदम मारहाण करतच होते. मुख्यमंत्र्यांना दिली खोटी माहिती, अधिकाऱ्यावर झाला गुन्हा दाखल पुरुषोत्तम शर्मा हे सायबर सेल आणि एसटीएफचे स्पेशल डीजी होते. त्यावेळीही त्याचे नाव  हनी ट्रॅप प्रकरणात समोर आले होते. पण आपले नाव या प्रकरणात समोर आल्यामुळे त्यांनी तत्कालीन डीजीपी व्हि.के. सिंह यांच्यावरच गंभीर आरोप केले होते. 'व्हि.के. सिंह यांनी आपल्यावर खोटे आरोप केले असून प्रतिमा मलीन करण्याचे काम केले' असा आरोप शर्मांनी केला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या