• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • साध्वी प्रज्ञांना जिंकवण्यासाठी BJPनं आखली 'ही' मोठी योजना

साध्वी प्रज्ञांना जिंकवण्यासाठी BJPनं आखली 'ही' मोठी योजना

भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

 • Share this:
  भोपाळ, 7 मे : लोकसभा निवडणूक 2019 मुळे देशभरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली असतानाही सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं सुरूच आहे. अशातच भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासाठी ही 'आर या पार'ची लढाई आहे. तर दुसरीकडे भाजपनं आपला गड कायम टिकवण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. वाचा :...शरद पवारांनी पाणी-शेतीबाबत कायमस्वरूपी कोणत्या योजना राबवल्या?-उद्धव ठाकरे प्रज्ञा ठाकूर यांना जिंकवण्यासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी मोठी योजना आखण्यात आली आहे. या योजनेनुसार भाजपकडून दिग्विजय सिंह यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येत आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. जेथे-जेथे काँग्रेसचं वर्चस्व आहे, त्या-त्या ठिकाणांवर अंतिम टप्प्यातील प्रचारामध्ये भाजप आपलं लक्ष्य केंद्रीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यातील प्रचारची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सांभाळणार आहेत. वाचा :VIDEO : 'सामना'तील 'त्या' अग्रलेखाबद्दल संजय राऊत बॅकफूटवर, म्हणाले... शिवाय, दिग्विजय सिंह यांच्याकडून होणाऱ्या प्रचाराच्या पद्धतींवरही भाजप नजर ठेवून आहे. दुसरीकडे, वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या जय-पराजयामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान काँग्रेसच्या प्रत्येक हालचालींवर भाजप बारीक नजर ठेवून आहे. वाचा :VIDEO : डाव्यांनी बंगालच्या राजकारणात हिंसेला सुरुवात केली - अमित शहा जवळपास 30 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असणारी ही जागा हिसकावून घेण्यासाठी काँग्रेसनंही संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजप आणि काँग्रेसच्या या अटीतटीच्या सामन्यात कोणाच्या ताब्यात ही जागा जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. SPECIAL REPORT : आंतरजातीय विवाह करणं पाप आहे का?
  First published: