VIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय

VIDEO : लोकांचा रोष, प्रचाराला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने घेतला काढता पाय

सतत 15 वर्ष सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. या नाराजीचा फटका खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नी साधना सिंग यांनाच बसलाय.

  • Share this:

भोपाळ,ता.14 नोव्हेंबर : मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. गेली 15 वर्ष सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. या नाराजीचा फटका खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नी साधना सिंग यांनाच बसलाय. साधना सिंग या शिवराजसिंग यांचा मतदारसंघ असलेल्या बुधनीत बुधवारी प्रचारासाठी आल्या होत्या. गल्ली मोहोल्ल्यात प्रचार फेरी काढून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. मात्र अनेक भागात त्यांना महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला.


गेल्या काही निवडणुकीत तुम्ही फक्त आश्वासनं दिलीत. ती प्रत्यक्षात मात्र आली नाहीत. तुम्ही घर देतो असं आश्वासन दिलं, त्याचं काय झालं? आमच्या परिसरात ड्रेनेजची व्यवस्था नाही, रस्ते नाही, लाईट नाही, पीण्याचं पाणी नाही अशी प्रश्नांची सरबत्ती लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींवर केली.


हा मतदार संघ हा शिवराजसिंग यांचाच असल्यानं या प्रश्नांनी साधना सिंग या भांबावून गेल्या. शेवटी थातुर-मातुर उत्तरं आणि आश्वासनं देत त्यांनी प्रचारातून काढता पाय घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी गेल्यानंतरही लोकांना आपली नाराजी व्यक्त केली.


निवडणुका आल्यावरच फक्त नेते मतं मागायला येतात निवडुण आल्यावर मात्र विसरून जातात असं त्यांचं म्हणणं होतं. शिवराजसिंग प्रचारात विकासाचे मोठ मोठे दावे करतात मात्र त्यांच्या पत्नीलाच लोकांच्या रोषाचा सामना करावा लागल्यानं निवडणुक त्यांना जड जाणार अशीच शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 05:16 PM IST

ताज्या बातम्या