नव्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण उद्या, 4 तासांहून अधिक काळासाठी असेल छाया

नव्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण उद्या, 4 तासांहून अधिक काळासाठी असेल छाया

सरत्या वर्षी सूर्यग्रहण अनुभवल्यानंतर आता नव्या वर्षात चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. हे चंद्रग्रहण 10 जानेवारीला असेल आणि या ग्रहणाचा कालावधी आहे, 4 तासांचा.

  • Share this:

मुंबई, 9 जानेवारी: सरत्या वर्षी सूर्यग्रहण अनुभवल्यानंतर आता नव्या वर्षात चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. हे चंद्रग्रहण 10 जानेवारीला असेल आणि या ग्रहणाचा कालावधी आहे, 4 तासांचा. 2019 मध्ये 26 डिसेंबरला वर्षाच्या शेवटी सूर्यग्रहण पाहायला मिळालं होतं. भारतातल्या अनेक शहरांमधून हे सूर्यग्रहण पाहता आलं. तब्बल 58 वर्षांनंतर इतकं मोठं सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव अनेक खगोलप्रेमींनी घेतला. काही ठिकाणी हे ग्रहण कंकणाकृती स्वरुपात दिसलं, त्यामुळे त्याला कंकणाकृती ग्रहण असंही म्हणण्यात आलं.

यावर्षी 6 ग्रहणं

10 जानेवारीला पौष पौर्णिमेला म्हणजेच येत्या शुक्रवारी चंद्रग्रहण आहे. 4 तास चालणारं हे ग्रहण रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री 2 वाजून 42 मिनिटांनी संपेल. हा कालावधी एकूण 4 तास 5 मिनिटं इतका असणार आहे. याआधी 11 फ्रेब्रुवारी 2017 ला अशा प्रकारचं चंद्रग्रहण झालं होतं. 2020 या वर्षात एकूण 6 ग्रहणं असतील. यापैकी 4 चंद्रग्रहणं आणि 2 सूर्यग्रहणं असणार आहेत.  तर 2020 या नवीन वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 21 जूनला असणार आहे.

अंधश्रद्धा नको

जगभरात ग्रहणाकडे निसर्गाचा चमत्कार म्हणून पाहणारे बरेच जण आहेत पण सोबतच अनेक लोकांच्या मनात ग्रहणाविषयी अंधश्रद्धाही आहेत. विशेषत: गर्भवती महिलांना ग्रहणकाळात विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते अनेक जण धार्मिक विधीही करतात. ग्रहण काळात केलेले पदार्थ खायचे नाहीत अशीही बऱ्याच जणांची अंधश्रद्धा असते. गर्भवती महिला ग्रहण काळात घरातून बाहेर पडल्या तर त्याचा थेट परिणाम बाळावर होतो यावरही अनेकांचा विश्वास आहे.

(हेही वाचा : 'या' 7 गोष्टींनी दिवसाची सुरवात करणं ठरेल फायदेशीर!)

लोक ग्रहणाविषयी असलेल्या अंधश्रद्धेला आणि चुकीच्या प्रथांना बळी पडून ग्रहणकाळात विविध विधी करण्यावर विश्वास ठेवतात. ग्रहणानंतर स्नानाला महत्त्व दिलं जातं तर अनेकजण ग्रहण काळानंतर दान करण्यावरही विश्वास ठेवतात. विज्ञानयुगामध्ये मात्र या अंधश्रद्धा मागे पडण्याची आवश्यकता आहे. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर निसर्गाचा हा चमत्कार आपल्याला चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2020 09:32 AM IST

ताज्या बातम्या