भावाच्या मृत्यूनंतरही प्रियंका गांधींच्या सुरक्षेसाठी थांबल्या होत्या CO अर्चना सिंह

भावाच्या मृत्यूनंतरही प्रियंका गांधींच्या सुरक्षेसाठी थांबल्या होत्या CO अर्चना सिंह

प्रियंका गांधी यांच्या कार्यक्रमादरम्यान, सुरक्षा व्यवस्था हाताळणार्‍या आयपीएस अधिकारी डॉ. अर्चना यांच्या भावाचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याची बातमी मिळाली.

  • Share this:

लखनऊ, 29 डिसेंबर : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये शनिवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) यावरुन मोदी सरकारविरोधात निषेध नोंदवत होत्या. यावेळी पोलिसांनी प्रियंका गांधी यांना लखनऊच्या मॉडर्न कंट्रोल रूमच्या आयपीएस अधिकारी आणि सीईओ अर्चना सिंह यांच्यावर गळा आवळून ढकलून दिल्याचा आरोप केला. पण तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की जेव्हा डॉ. अर्चना सिंह प्रियंका गांधी यांच्या ताफ्याच्या सुरक्षिततेची काळजी घेत होत्या तेव्हा त्यांच्या भावाच्या मृत्यूची बातमी मिळाली होती. पण तरीदेखील त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही.

प्रियंका गांधी यांच्या कार्यक्रमादरम्यान, सुरक्षा व्यवस्था हाताळणार्‍या आयपीएस अधिकारी डॉ. अर्चना यांच्या भावाचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याची बातमी मिळाली. आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्या थोडा वेळ निघून गेल्या. पण प्रियंका गांधींचा कार्यक्रम संपेपर्यंत त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही आणि कोणालाही याबद्दल सांगितलं नाही.

इतर बातम्या - बिग बी अमिताभ बच्चन यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान, पाहा VIDEO

प्रियांका गांधींच्या संरक्षणादरम्यान डॉ. अर्चना या गळा दाबल्याच्या आरोपावरून चर्चेत आल्या. पण तातडीने हे स्पष्ट झालं की असं काही घडलेलं नाही आणि प्रियंका गांधी यांच्या वतीने हा खोटा आरोप केला जात आहे. डॉ. अर्चना या प्रियांका गांधींच्या आरोपामुळे खूप दुखावल्या होत्या.

प्रियंका गांधी निघून गेल्यानंतर सीओ डॉ. अर्चना यांनी चुलत भावाचे निधन झाल्याची माहिती एसएसपीला दिली. ज्या भावाबरोबर त्या लहानपणी खेळत मोठ्या झाल्या, त्यांचे दिल्ली रुग्णालयात कावीळ आजाराने निधन झाले. खरंतर भावाला भेटायला जाण्यासाठी अर्चना यांनी रजा मागितली होती, परंतु त्याला सुट्टी मिळाली नाही. आपल्या भावाचे निधन झाल्यानंतर, डॉ. अर्चना यांनी लखनऊच्या एसएसपी कलानिधी नैथानींकडून त्यांच्या भावाच्या अंत्यविधीसाठी बिहार जाण्यासाठी परवानगी मागितली आहे.

इतर बातम्या - भाजप नगरसेविकेची आत्महत्या, विष प्राशान करून आयुष्य संपवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2019 06:48 PM IST

ताज्या बातम्या