बाबरी खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा,मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यास कोर्टाचा नकार

बाबरी खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा,मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यास कोर्टाचा नकार

  • Share this:

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : बाबरी मस्जिद खटल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निर्णय दिलाय. बाबरी खटला हा मोठ्या खंडपीठाकडे सोपवणार नाही. हा वाद सोडवण्यात आता आणखी उशीर नको अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली. त्यामुळे बाबरी मस्जिद खटल्याचा निकाल लवकरच सुटणार आहे.

सुप्रीम कोर्टाने 29 आॅक्टोबरपासून बाबरी खटल्याच्या सुनावणीला हिरवा कंदील दिलाय. मशीद इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे की नाही, याबाबत निर्णय वाचायला कोर्टात सुरुवात झाली. याबाबतचा खटला मोठ्या खंडपीठाकडे सोपवणार नाही असं निर्णय न्यायमूर्तींच्या बहुमतानं घेतला.

सुप्रीम कोर्टात मुस्लिम समाजाकडून युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला यावा. या प्रकरणाचा निर्णय हा मोठ्या खंडपीठाकडे द्यावा की नाही याबद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्टाने 20 जुलै रोजी राखून ठेवला होता.

आज कोर्टाने स्पष्ट केलंय की, अधिग्रहणापासून मशिदीही सुटल्या नाही.बाबरीचा खटला मोठ्या खंडपीठाकडे सोपवणार नाही. हा वाद सोडवण्यात आता आणखी उशीर होणार नाही अशी भूमिका मांडली.

मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याच्या निकालाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०मध्ये वादग्रस्त जमिनीच्या त्रिभाजनाचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरोधातील याचिकांच्या सुनावणीत मशीदीचा हा मुद्दा आहे.

1994मध्ये एम. इस्माईल फारूकी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात पाच सदस्यीय खंडपीठाने मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानुसार वादग्रस्त जमिनीचे सरकारला अधिग्रहण करता येईल, असे पाच सदस्यीय पीठाने तेव्हा स्पष्ट केले होते. त्या निकालाचा विस्तारित पीठाकडून पुनर्विचार केला जावा, अशी मागणी अयोध्या मालमत्ता वादात पुढे आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय पीठाने आज निर्णय दिला.

काय आहे संपूर्ण प्रकरण

- मशीद ही इस्लामचा अविभाज्य घटक नाही, 1994 साली सुप्रीम कोर्टाचा निर्णय

- 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं दिला निर्णय

- या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात

- खटला सध्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे

- खटला मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावा, याचिकाकर्त्यांची मागणी

- मशिदीबाबतचा निर्णय कोर्ट कायम ठेवणार का, याकडे लक्ष

- राम जन्मभूमी खटल्यावर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो

- राम जन्मभूमी खटल्यावर उद्या (शुक्रवारी) निर्णय अपेक्षित

-------------------------------------------------------------------

VIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून केला खून,पोलिसांची बघ्याची भूमिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 02:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading