मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे की नाही? सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय

मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे की नाही? सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय

मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याच्या निकालाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 27 सप्टेंबर : मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याच्या निकालाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०मध्ये वादग्रस्त जमिनीच्या त्रिभाजनाचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरोधातील याचिकांच्या सुनावणीत मशीदीचा हा मुद्दा येणार आहे.

1994मध्ये एम. इस्माईल फारूकी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात पाच सदस्यीय खंडपीठाने मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानुसार वादग्रस्त जमिनीचे सरकारला अधिग्रहण करता येईल, असे पाच सदस्यीय पीठाने तेव्हा स्पष्ट केले होते. त्या निकालाचा  विस्तारित पीठाकडून पुनर्विचार केला जावा, अशी मागणी अयोध्या मालमत्ता वादात पुढे आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय पीठ आज दुपारी दोन वाजता निर्णय देण्याची शक्यता आहे.

तर, मुस्लिम पक्षांचं म्हणणं आहे की, हा निर्णय चुकीचा आहे. म्हणून, या प्रकरणात पुन्हा विचार केला जावा असं मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

अशात सर्वोच्च न्यायालयानं जर पुन्हा विचार करण्याचा निर्णय दिला तर इस्माइल फारूकीचा निर्णय 5 पेक्षा अधिक न्यायाधीशांच्या पाठिंब्यावर पाठविला जाईल. म्हणजे अयोध्या विवादांचा मुद्दा यावेळी टाळला जाईल. दरम्यान, ही जागा कोणाची आहे या निर्णयापेक्षा मशीद ही इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे की नाही यावर निकाल देणं महत्त्वाचं आहे आणि कोर्टाच्या या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण

- मशीद ही इस्लामचा अविभाज्य घटक नाही, 1994 साली सुप्रीम कोर्टाचा निर्णय

- 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं दिला निर्णय

- या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात

- खटला सध्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे

- खटला मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावा, याचिकाकर्त्यांची मागणी

- मशिदीबाबतचा निर्णय कोर्ट कायम ठेवणार का, याकडे लक्ष

- राम जन्मभूमी खटल्यावर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो

- राम जन्मभूमी खटल्यावर उद्या (शुक्रवारी) निर्णय अपेक्षित

First published: September 27, 2018, 9:10 AM IST

ताज्या बातम्या