विना हेल्मेट काँग्रेस नेत्यासोबत स्कूटीवरून गेल्या प्रियंका गांधी, पोलिसांनी कापलं चलन

विना हेल्मेट काँग्रेस नेत्यासोबत स्कूटीवरून गेल्या प्रियंका गांधी, पोलिसांनी कापलं चलन

धीरज यांनी हेल्मेट न घातल्यामुळे लखनऊ पोलिसांनी चलन कापल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:

लखनऊ, 29 डिसेंबर : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना स्कूटीवरून घेऊन जाणाऱ्या कॉंग्रेस नेत्याचं लखनऊ ट्रॅफिक पोलिसांनी 6300 रुपयांचे चलन कापलं आहे. प्रियांका गांधी शनिवारी संध्याकाळी माजी आमदार आयपीएस एसआर दारापुरी यांच्या घरी जात असताना कॉंग्रेसचे आमदार धीरज गुर्जर (Dheeraj Gurjar)यांच्या स्कूटीवर गेल्या होत्या. यावेळी धीरज यांनी हेल्मेट न घातल्यामुळे लखनऊ पोलिसांनी चलन कापल्याची माहिती समोर येत आहे.

कॉंग्रेसचे आमदार धीरज गुर्जर चालवत होते स्कूटी

स्कूटी चालवणारे कॉंग्रेसचे आमदार धीरज गुर्जर आणि प्रियांका गांधी यांनी हेल्मेट घातले नव्हते. यासाठी 6300 रुपयांची पावती त्यांना फाडावी लागली आहे. प्रियंका गांधी शनिवारी माजी आयपीएस अधिकारी एसआर दारापुरी यांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखलं. पोलिसांनी थांबवल्यानंतर प्रियंका गांधी यांनी पुढचा प्रवास स्कूटीवरून केला. नागरिकत्व कायद्याविरोधात नुकत्याच झालेल्या हिंसाचारात भारतीय पोलीस सेवेचे माजी अधिकारी एसआर दारापुरी यांना अटक करण्यात आली आहे.

प्रियंकाने पोलिसांवर गळा दाबल्याचा आरोप केला, पोलिसांनी दिला नकार

प्रियांका गांधी यांनी शनिवारी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते की, पोलिसांनी त्यांचा गळा दाबला आणि धक्काबुक्की केली. मात्र, पोलिसांनी या आरोपांना नकार दिलं आहे. आम्ही असं काहीही केलं नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

रॉबर्ट वड्रा यांनी प्रियंका गांधी यांचे केले कौतुक

रविवारी, प्रियंका गांधींनी लखनऊमध्ये पोलिसांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याच्या एक दिवसानंतर, त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी गरजू लोकांपर्यंत पोहचण्याच्या त्यांच्या या कृतीचे कौतुक केले.

प्रियंका गांधी यांच्याविरूद्ध 'गैरवर्तन' केल्याबद्दल युवा कॉंग्रेसचा निषेध

नवी दिल्लीतील उत्तर प्रदेश भवनाजवळ लखनऊमध्ये रविवारी झालेल्या पोलीस गैरव्यवहाराविरोधात कॉंग्रेसच्या युवा संघटनेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2019 09:30 PM IST

ताज्या बातम्या