Home /News /news /

निर्दयी! भर चौकात केला पत्नीचा खून, हातात कापलेले शीर घेऊन निघाला चालत

निर्दयी! भर चौकात केला पत्नीचा खून, हातात कापलेले शीर घेऊन निघाला चालत

पत्नीचं कापलेलं शीर हातात घेऊन पती थेट पोलीस स्थानकात गेला. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    लखनऊ, 02 फेब्रुवारी : शनिवारी निर्घृणतेचा एक धक्कादायक घटना समोर आला आहे. एका जोडप्यामधील वादाने इतकं वेदनादायी वळण घेतले की संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. भांडणामध्ये संतप्त झालेल्या पतीने भर रस्त्यामध्ये पत्नीचं गळा कापला. बरं इतकंच नाही तर पत्नीचं कापलेलं शीर हातात घेऊन पती थेट पोलीस स्थानकात गेला. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे आहे संपूर्ण प्रकरण जहांगीराबाद पोलीस स्टेशन परिसरातील गाव बहादूरपूर येथील रहिवासी अखिलेश रावत याचे तीन वर्षापूर्वी सात्रिक पोलीस स्टेशन परिसरातील परकुआ गाव येथील गोकसवाड रावत यांची मुलगी रंजनाशी लग्न झाले होते. सुमारे दीड महिन्यांपूर्वी रंजनाची तीन महिन्यांची मुलगी आजाराने मरण पावली. घटनेनंतर रंजना माहेरी राहत होती. चार दिवसांपूर्वी रंजना सासरी अखिलेशकडे राहण्यासाठी आली होती. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास अखिलेश आणि रंजना (वय 25) यांच्यात भांडण झाले. आरोपी अखिलेशने त्याच्या पत्नीला घराबाहेर व्हरांड्यात मारहाण केली आणि चापट मारली. पण वाद वाढला आणि त्याने चाकूने तिचा गळा कापून खून केला. इतर बातम्या - 'स्वत:ला हिंदू म्हणत असाल तर...', शाहीन बाग गोळीबारावर सोनम कपूर भडकली सगळ्यात धक्रादायक म्हणजे आरोपी पतीने निर्दयीपणे मृत पत्नीचे शीर कापून हातात पकडले आणि वर्दळीच्या रस्त्यातून पोलीस स्टेशन गाठले. या गंभीर घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अर्ध्या तासानंतर अखिलेश दीड किमी दूर असताना पोलिसांनी त्याला अटक केली. एसपी, डॉ. अर्शववाद चतुर्वेदी, एएसपी आरएस गौतम यांनी घटनेची माहिती घेतली. हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये घडला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून घटनास्थळावरून मृतदेह आणि शीर ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. माहिती मिळाल्यावर मृत तरुणीच्या वडिलांनी जावई अखिलेशसह चौघांविरोधात खूनाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एसपी म्हणाले की, खटला दाखल करण्यात आला आहे. घटनेशी संबंधित इतर बाबींचा देखील शोध घेण्यात येत आहे. इतर बातम्या - शाहीन बाग गोळीबार: युवकाने सांगितलं गोळीबार करण्याचं कारण, पोलिसही हैराण घडलेला प्रकार पाहून नागरिक हादरले रक्ताने माखलेले पत्नीचे शीर भर रस्त्यातून, लोकांच्या गर्दीतून घेऊन जाणाऱ्या अखिलेशला पाहिल्यानंतर नागिरकांच्या पायाखालची जमीन हादरली. परसिरात या घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे. अशात पोलिसांनी आरोपीला घेरलं आणि त्याला ताब्यात घेतले. तर पोलीस आता पुढील तपास करत आहेत. इतर बातम्या - स्वयंपाक घरावर बजेटची संक्रांत, काय महागलं आणि काय झालं स्वस्त?
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या