हॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये घुसला BSP नेत्याचा मुलगा, विरोध केल्यावर रोखली बंदूक

हॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये घुसला BSP नेत्याचा मुलगा, विरोध केल्यावर रोखली बंदूक

आशिष पांडे असं या आरोपी मुलाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशमधील नेता आणि माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दारूच्या नशेत धुंद असलेला एक व्यक्ती महिला शौचालयात गेला. शौचालयातील महिलेने विरोध केला असता तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि त्याचाच व्हिडिओ आता समोर आला आहे.

आशिष पांडे असं या आरोपी मुलाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशमधील नेता आणि माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारानंतर आशिष पांडेला ताब्यात घेण्यासाठी लखनऊला पोलीस रवाना झाले आहेत.

दिल्लीचे संयुक्त पोलिस आयुक्त अजय चौधरी यांनी सांगितलं की, आरोपींवर आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आयपीसी 323, 341, 506, 354 आणि 506 धारा एफआयआर दाखल केली आहे.

दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमधला गुन्हेगारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक युवक पिस्तूलच्या जोरावर एका महिलेला धमकावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हॉटेलचे सुरक्षा कर्मचारीही बाजूला उभे असलेले दिसत आहेत.

या गुंडागर्दीनंतर काही लोकांनी हा प्रकार थांबवला आणि त्यानंतर आरोपी आशिष कारमध्ये बसून निघून गेला. पण त्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही आणि त्याने त्या तरुणीला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तर तुला बघून घेईन अशी धमकीही दिली.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये 3 तरुणी त्या कारमध्ये बसल्या असल्याचंही दिसून येत आहे. अद्याप कोणत्याच तरुणीने किंवा हॉटेल स्टाफने या प्रकाराबद्दल तक्रार दाखल केली नसल्याचं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

धक्कादायक VIDEO, रामलीलात तोंडातून आग काढताना कलाकार जळाला

First published: October 16, 2018, 4:46 PM IST

ताज्या बातम्या