नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: महागाईमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Today) इ. मध्ये वाढ झाल्याने अनेकांचं महिन्याचं बजेट कोलमडलं आहे. दरम्यान एलपीजी गॅस सिलेंडरचे दरही (LPG Gas Cylinder Price) सातत्याने वाढत आहेत. गेल्या सात वर्षांत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. मात्र, यादरम्यान ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरवर (LPG Gas Cylinder Subsidy) सब्सिडी दिली जात आहे. अनुदानाचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात आहेत. माहितीनुसार, आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलिंडर सब्सिडी म्हणून देण्यात येत आहे.
दरम्यान काही ग्राहकांना 158.52 रुपये किंवा 237.78 सबसिडी मिळत आहे. या रकमेबाबत मात्र काहीसा संभ्रम कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या खात्यात अनुदान दिले जात नसल्याची प्रकरणे समोर आली होती.
हे वाचा-Airtel नंतर VIचा प्रीपेड युजर्सना झटका! टॅरिफ प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ
सब्सिडी मिळते आहे की नाही हे तुम्ही देखील तपासा
सब्सिडीचे पैसे मिळत आहेत की नाही हे तपासण्यासाठी दोन मार्ग आहेत. एकतर रजिस्टर्ड मोबाइलच्या माध्यमातून तुम्ही तपासू शकता किंवा दुसरी म्हणजे एलपीजी आयडीच्या माध्यमातून, हा आयडी तुमच्या गॅस पासबुकवर लिहिलेला असतो. जाणून घ्या काय आहे प्रोसेस.
1. सर्वप्रथम तुम्ही http://mylpg.in/ वर जा आणि तेथे LPG सब्सिडी ऑनलाइन वर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला तीन एलपीजी सिलेंडर कंपन्यांचे टॅब दिसतील. तुमचा सिलेंडर ज्या कंपनीचा आहे त्यावर क्लिक करा. समजा तुमच्याकडे इंडेन गॅसचा सिलेंडर आहे, तर Indane वर क्लिक करा.
2. यानंतर, Complaint पर्याय निवडल्यानंतर, नेक्स्ट बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस उघडेल, ज्यामध्ये तुमचे बँक तपशील असतील. तपशिलांवरून तुम्हाला समजेल की सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात येत आहेत की नाही.
हे वाचा-Dolly Khanna यांची या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का हा शेअर?
सरकार या अनुदानावर किती खर्च करते?
2021 या आर्थिक वर्षात अनुदानावरील सरकारचा खर्च 3,559 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2020 मध्ये हा खर्च 24,468 कोटी रुपये होता. वास्तविक ही DBT स्कीम आहे जी जानेवारी 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती, ज्या अंतर्गत ग्राहकांना विनाअनुदानित LPG सिलेंडरसाठी संपूर्ण रक्कम भरावी लागते. त्याचबरोबर अनुदानाचे पैसे सरकारच्या वतीने ग्राहकांच्या बँक खात्यात परत केले जातात. हा रिफंड थेट ग्राहकांना पाठवला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LPG Price