03 मे : केंद्र सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 2 रुपयांची तर केरोसीनच्या दरात प्रतिलिटर 26 पैशांनी वाढ केली. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.
केंद्र सरकार लवकरच पेट्रोलियम पदार्थांवर देण्यात येणारं अनुदान हटविण्याचा विचार करत आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडर एलपीजीची किंमत 1.87 रुपयाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता एका 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 442.77 रुपयांवर पोचली आहे. गेल्या महिन्यात 1 एप्रिल रोजी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 5 रुपये 57 पैशांनी वाढवण्यात आली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा