Elec-widget

सिलेंडर महागले, हे आहेत नवे दर

सिलेंडर महागले, हे आहेत नवे दर

अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आलीये.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जून : महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामन्यांचं किचन बजेट आता आणखी कोलमडणार आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आलीये.

अनुदानित सिलेंडरच्या दरात 2.71 पैसे वाढ करण्यात आलीये. तर विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 55.50 पैशांनी वाढ केलीये. एलपीजीच्या आंतराष्ट्रीय दरात वाढ आणि डाॅलरच्या तुलनेत रुपयाची झालेल्या घसरणीमुळे ही वाढ करण्यात आलीये. दिल्लीत अनुदानित सिलेंडरच्या दरात शनिवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

VIDEO : कुर्ला स्थानकावर महिला चोराला पकडण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला मागील महिन्याचे सरासरी दर आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाची किंमतीवर दरवाढ अवलंबून असते.

VIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाण

Loading...

विनाअनुदानित सिलेंडरचे दर हे जीएसटीमुळे किंमती वाढल्या आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात सिलेंडरचे दर वाढल्यामुळे विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 55.50 रुपये वाढ झालीये.

स्विस बँकेत 'तो' काळा पैसा नाही-अरुण जेटली

इंडियन आॅईलने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2018 मध्ये ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची रक्कम 257.74 प्रति सिलेंडर झाली आहे. जे जूनमध्ये 204 इतके होते. त्यामुळे अनुदानित सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा आहे.

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाहीच!,अर्थ सचिवांचं स्पष्टीकरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2018 11:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...