Home /News /news /

लॉकडाऊनमध्ये LPG Gas Cylinder वाढवणार टेन्शन, भाववाढीनंतर आता...

लॉकडाऊनमध्ये LPG Gas Cylinder वाढवणार टेन्शन, भाववाढीनंतर आता...

LPG Cylinder Subsidy तुमच्या बँक खात्यात जमा होतेय का? असं तपासा

LPG Cylinder Subsidy तुमच्या बँक खात्यात जमा होतेय का? असं तपासा

LPG Cylinder: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध वाढलेले आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. LPG सिलेंडर मिळायला वेळ लागणार आहे. त्यामुळे सिलेंडर बुकिंग (Booking) करुनही वाट पहावी लागणार आहे.

  नवी दिल्ली, 28 एप्रिल : कोरोनाच्या (Covid-19)  वाढत्या संक्रमणात सगळ्याच गोष्टींवर परिणाम झालेला असताना, वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. त्यामुळे पुढील काळात LPG सिलेंडर ( Gas Cylinder)  संपल्यास डिलीव्हरीसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. त्यातच व्हेंडर्स, कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात संक्रमित झाले आहेत. गेल्या 20 दिवसात सिंलेडरचा वेटींग पिरेड 1 दिवसावरून वाढून 3 दिवस झालेला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुढील काळात, सिलेंडर डिलीव्हरीला आणखीन वेळ लागणार आहे. 20 टक्के डिलीव्हरी मॅन कोरोना संक्रमित - एका अहवालानुसार, 20 टक्क्यांपेक्षा जास्त डिलीव्हरी मॅनला कोरोनाची लागण झाली आहे. 2020 मध्ये, 5 टक्के डिलिव्हरी मॅनला कोरोनाची लागण झाली होती. वेटींग पिरियड वाढणार - कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आतापर्यंत 18 टक्के डिलिव्हरी मॅन गावी गेले आहेत. त्यामुळे डिलीव्हरी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात सिलेंडरसाठी आणखी वाट पाहावी लागू शकते. पुढील महिन्यापासून 4 ते 5 दिवसही सिलेंडरसाठी प्रतिक्षा करावी लागू शकते. सिलेंडर बुकिंगमध्ये घट - वाढत्या कोरोनामुळे, देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सिलेंडर बुकिंगही कमी झालं आहे. कोरोना काळातील बुकिंकचा आकडा पाहता एप्रिलमधील व्यावसायिक सिलेंडर बुकिंगमध्ये 80 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमध्ये 25 टक्के घट झाली  आहे. उज्ज्वला ग्राहकांचं मासिक बुकिंग 20-25 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे.

  (वाचा - तुमच्याकडे नसेल हा 4 अंकी कोड;तर मिळणार नाही LPG Cylinder,जाणून घ्या या नंबरबाबत)

  बुकिंगची पद्धत बदलणार - मागच्या वर्षी, 1 नोव्हेंबर 2020 पासून सिलेंडरच्या बुकिंग प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. गॅस सिलेंडरचं बुकिंग (Cylinder Booking) ओटीपी (OTP) आधारित झाले आहे. बुकिंग सिस्टम अधिक सुरक्षित आणि अधिक सुयोग्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. आता पुन्हा एकदा एलपीजी बुकिंग आणि वितरण व्यवस्था अधिक सुलभ करण्याची तयारी सुरू आहे. गॅस सिलेंडर रिफिलींगची पद्धत बदली - एलपीजी गॅस आणि रिफिल बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि वेगवान केली जावी यासाठी सरकार आणि तेल कंपन्या विचार करत आहेत. नवीन नियमांनुसार, ग्राहक एलपीजी रिफिलसाठी स्वत:च्या गॅस एजन्सीवर अवलंबून राहणार नाही. संपलेला गॅस सिलेंडर इतर कोणत्याही जवळच्या गॅस एजन्सीवर जाऊन, एलपीजी सिलेंडर पुन्हा भरुन मिळू शकणार आहे. सरकार आणि तेल कंपन्या यासाठी इंटिग्रेटेड प्लेटफॉर्म (Integrated platformतयार करणार आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Coronavirus, Gas, LPG Price

  पुढील बातम्या