खूशखबर! लॉकडाऊनमध्ये घरगुती सिलिंडर 162.5 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या दर

खूशखबर! लॉकडाऊनमध्ये घरगुती सिलिंडर 162.5 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या दर

14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर 162. 5 रुपयांनी तर 19 किलो सिलिंडर 256 स्वस्त झाला आहेत.

  • Share this:

मुंबई, 01 मे : देशात लॉकडाऊनदरम्यान मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. देशातील तेल विपणन कंपनीनं (HPCL, BPCL,IOC) विना अनुदानित LPG गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर 162. 5 रुपयांनी स्वस्त झाला आहेत. दिल्लीत या नवीन सिलिंडरची किंमत 581.50 रुपये आहे. त्याच वेळी 19 किलो वजनाचा सिलिंडर 256 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आधीच लॉकडाऊनमध्ये इंधन आणि भाज्यांचे दर वाढत असताना सिलिंडर स्वस्त झाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

IOC ने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सिलिंडरचे दर 744 वरून 581 वर आले आहेत. कोलकातामध्ये हे दर 584.50, मुंबईत 579.00 तर चैन्नईत 569.50 रुपये झाले आहेत.

हे वाचा-रखरखत्या उन्हात शेतात सापडलं स्त्री अर्भक, महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना

काय आहेत 19 किलो ग्रॅम घरगुती सिलिंडरचे दर जाणून घ्या

1 9 किलोग्रॅम LPG गॅस सिलिंडर 256 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे आता गृहिणींना आपलं घऱचं बजेट बसवणं सोपं जाणार आहे. याआधी हा सिलिंडर 1285.50 रुपयांना मिळत होता तो 1029. 50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 978.00, चेन्नईत 1144.50 रुपयांना नागरिकांना हा घरगुती सिलिंडर उपलब्ध होणार आहे.

सलग 38व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत

लॉकडाऊनच्या आज 38 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. लॉकडाऊनमुळे देशात बऱ्याच गोष्टी ठप्प आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक मंदावली आहे.

हे वाचा-विधानपरिषद निवडणुकीचं बिगुल फुंकलं, मतदान तारखेचीही झाली घोषणा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 1, 2020, 12:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading