रायचंद शिंदे (प्रतिनिधी)
शिरुर, 2 मे- तालुक्यातील सणसवाडीतल्या चेअरमनवस्तीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग भडकली. वस्तीतील 4 कौलारू घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आणि बेचिराख झाली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. स्थानिक युवकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. रांजणगाव येथील अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत होत्याचे नव्हते झाले.
चेअरमनवस्तीत दाटवाटी असल्याने आग विझविण्यास मोठी कसरत करावी लागली. स्थनिक नागरिकांनी तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. स्फोटाने उडालेल्या कौलांमुळे बाजूच्या 4 मुलांना दुखापत झाली आहे. चेअरमनवस्तीत तात्याभाऊ, दत्तात्रय, मॅचिंद्र व किसन जयवंत दरेकर यांचे जुन्या धर्तीचे कौलारू 20 खन घर आहे. मुले, नातवंडे असा परिवार या घरात राहत आहे. त्यातील पूर्वच्या बाजूच्या खोलीत विजय तात्याबा दरेकर पत्नी व 3 मुलांसह राहत असून आज सकाळी तळेगाव येथील एजन्सीतून आणलेला सिलिंडर लावत असतानाच भडका होऊन स्फोट झाला. घराची कौले दूर पर्यंत उडाली. भीषण आग लागली. आजूबाजूचे युवक धावले व वायरमानला फोन करून लाईट कनेक्शन बंद केले. तोवर शेजारच्या घरांना आगीची धग पोहोचून त्यातील सिलिंडरचाही मोठा स्फोट झाला व आग भडकून शेजारील 4 घरे भस्मसात झाली.
VIDEO : शिक्षक की हिटलर? विद्यार्थिनींना बेदम मारहाण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LPG Cylinder Blast, Maharashtra news, Pune, Sanaswadi, Shirur