लोअर परेलचा पुल पादचाऱ्यांसाठी सुरु होणार?

लोअर परेलचा पुल पादचाऱ्यांसाठी सुरु होणार?

लोअर परेलचा पूलचा पूल परत सुरू करण्यासंदर्भात बुधवारी एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर पुलाचा भरीव भाग पादचाऱ्यांसाठी सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 24 जुलै : लोअर परेलचा पूलचा पूल परत सुरू करण्यासंदर्भात बुधवारी एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर पुलाचा भरीव भाग पादचाऱ्यांसाठी सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुल २४ जुलैपासून पूर्णतः बंद करण्यात आला आहे. रेल्वे आणि महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे वाहनधारकांसोबतच पादचाऱ्यांचीसुद्धा कोंडी झाली आहे.

पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील अंघेरी रेल्वेस्थानकाजवळील पुलाचा भाग कोसळ्याच्या दुर्घटनेनंतर रेल्वे आणि मुंबई महापालीकेने केलेल्या सर्व्हेक्षणानंतर लोअर परेल पुल धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट करुन रेल्वे आणि महापालिकेने २४ जुलै पासून हा पूल पूर्णतः बंद केला. या पूलावरून रोज 9 लाख लोक प्रवास करतात आणि 2 लाखापेक्षा जास्त वाहनं ये-जा करतात. हा पूल मध्य मुंबईला पूर्व-पश्चिमेस जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा पूल आहे. पूल सुरक्षेच्या दृष्टीने बंद केला असला तरी या पूलावरून प्रवास करणाऱ्यांनी आता रोज जायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला होता.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच!, शिवसेना आमदाराचा राजीनामा

याच संदर्भात बुधवारी पालिका आयुक्त, रेल्वे अधिकारी, आमदार अजय चौधरी आणि सुनिल शिंदे, वाहतूक पोलिस यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्या (गुरुवारी) पुन्हा पुलाची पाहणी केली जाणार असून, पुलाचा भरीव भाग पादचाऱ्यांसाठी सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  पुलाचे पाडकाम रेल्वे करणार असून, रेल्वेच्या रुळावरुन जाणारा भाग हा रेल्वे बांधणार तर उर्वरीत भाग महापालिका बांधणार किंवा रेल्वेला त्यालाठी निधी देणार असे या बैठकीत निश्चित करण्यात आले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा...

Mumbai Band LIVE :नवी मुंबईत आंदोलनाचा भडका, पोलिसांची दोन वाहनं जाळली

पैसे बुडवून विदेशात पळणाऱ्यांची आता खैर नाही, नव्या कायद्याला मंजूरी

सावळी आहे म्हणून पत्नीला पेटवले, आत्महत्येचा केला बनाव !

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2018 08:35 PM IST

ताज्या बातम्या