Home /News /news /

ऑनलाइन परिक्षेत मिळाले कमी गुण, 12 वर्षीय मुलाने केली आत्महत्या

ऑनलाइन परिक्षेत मिळाले कमी गुण, 12 वर्षीय मुलाने केली आत्महत्या

प्रज्योत जाधव गेल्या काही महिन्यांपासून नियमित ऑनलाइन शिक्षण घेत होता.

सिन्नर, 11 डिसेंबर : नाशिक (Nashik) शहरात एका अल्पवयीन मुलाने मोबाईल गेमच्या नादापायी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना सिन्नर तालुक्यात ऑनलाइन अभ्यासाच्या तणावातून एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पालकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्योत जाधव असं या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. लॉकडाउन लागल्यामुळे शाळा महाविद्यालय बंद आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू आहे. प्रज्योत जाधव गेल्या काही महिन्यांपासून नियमित ऑनलाइन शिक्षण घेत होता. होऊ दे खर्च! सूनेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सासऱ्यानं मागवलं हेलिकॉप्टर मात्र, नुकतीच ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत प्रज्योतला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे प्रज्योत नैराश्यग्रस्त झाला होता. त्यातून त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रज्योतच्या आत्महत्येमुळे जाधव कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 14 वर्षीय मुलाची पबजी गेमसाठी आत्महत्या तर नाशिक शहरातील भोई गल्लीत बुधवारी 9 डिसेंबर रोजी मोबाईल गेमपायी स्वरूप नावाच्या 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. स्वरुपला पबजी गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं. नेहमीप्रमाणे स्वरुप रात्री आपल्या घरातील वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला होता. पण सकाळी बराच उशीर झाल्यामुळे तो खालीच आला नव्हता. B'day Special: दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील घरांची किंमत ऐकून व्हाल हैराण त्यामुळे त्याच्या आईने रूममध्ये जाऊन पाहणी केली असता मुलाने गळफास घेतल्याचे आढळून आले.  मुलाचा मृतदेह पाहून आईने एकच आक्रोश केला. त्यामुळे घरातील इतर सदस्यांनी धाव घेतली असता धक्काच बसला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु, डॉक्टरांनी स्वरूपला तपासून मृत घोषित केले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या