2 भाऊ आणि एका तरुणीचं लव्ह ट्रँगल, अखेर एका भावाची दगडाने ठेचून हत्या

2 भाऊ आणि एका तरुणीचं लव्ह ट्रँगल, अखेर एका भावाची दगडाने ठेचून हत्या

एका तरुणीसोबबत प्रेमसंबंध होते. कालांतराने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. याचदरम्यान तरुणीचे राहुल याच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले.

  • Share this:

नागपूर, 25 फेब्रुवारी : त्रिकोणी प्रेमातून तरुणीच्या माजी प्रियकराने हातोड्याने डोके ठेचून तरुणाची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना रविवारी सायंकाळी संत गाडगेबाबानगर भागात रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे. राहुल शंकर तुरकेल (वय ३०, रा. भोलेबाबानगर)असं मृताचे नाव असून, रिचेश ऊर्फ रितेश दीपक सिकरवार (वय ३०, रा. गाडगेबाबानगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या मारेकऱ्याचं नाव आहे.

रितेश हा सातपुडा बारमध्ये वेटर आहे. राहुल हा महापालिकेत स्वच्छता कर्मचारी होता. रितेश हा नात्याने राहुलचा आतेभाऊ लागतो. रितेशचं एका तरुणीसोबबत प्रेमसंबंध होते. कालांतराने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. याचदरम्यान तरुणीचे राहुल याच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांनी लग्नही केले असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रितेश हा संतापला होता.

रविवारी रितेशने राहुलला त्याच्या घरी बोलावलं. दोघांनी दारू प्यायली. त्यावेळी पूजाचा विषय निघाला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि संतप्त होऊन रितेशने राहुलच्या डोक्यावर हातोड्याने वार केले.

हेही वाचा: LIVE Rising India 2019 : काँग्रेसने देशासाठी काय नाही केलं - कमलनाथ

या हल्ल्यात गंभीर जखम झाल्याने राहुलचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रितेशने घराला कुलूप लावलं आणि निघून गेला.  सायंकाळच्या सुमारास सुमारास रितेशचे वडील घरी आले. त्यांनी अन्य एका चावीने कुलूप उघडले. त्यावेळी राहुल घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती नंदनवन पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच नंदनवन पोलीस आणि गुन्हे शाखेचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे शवविच्छेदनासाठी रवाना केला. दरम्यान, राहुलची हत्या केल्यानंतर रितेश हा त्याची आई काम करणाऱ्या ठिकाणी गेला आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे आपण राहुलची हत्या केली असल्याची कबुली त्याने आईला दिली.

या सगळ्यानंतर रितेशच्या आईच्या पायाखालची जमिन हादरली. त्या रितेशला घेऊन हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. त्यानंतर पोलिसांनी रितेशला ताब्यात घेतलं.


VIDEO : SUV कारने आईसमोरच चिरडलं, काही क्षण लहानग्यावरच उभी होती गाडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 07:41 PM IST

ताज्या बातम्या