Home /News /news /

वडिलांना नाही बघवलं लेकीचं प्रेम, मुलासोबत कट रचून प्रियकराची केली निर्घृण हत्या

वडिलांना नाही बघवलं लेकीचं प्रेम, मुलासोबत कट रचून प्रियकराची केली निर्घृण हत्या

निलेश हंबीर आणि तरुणीच्या प्रेम प्रकरणावरून यापूर्वी घरात वाद झाल्याचं तपासात समोर आलं आहे. दोघांच्या प्रेमावरून दोन्ही घरात मोठा वाद झाला होता.

    शहापूर, 05 फेब्रुवारी : प्रेमसंबंधातून गुन्हे घडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. प्रेम प्रकरणातून प्रियकराची हत्या झाल्याचा एक धक्कादायक प्रकार शहापूर जिल्ह्यामध्ये समोर आलं आहे. गेल्या 2 वर्षांपासून तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. पण मुलीच्या घराच्यांना हे मान्य नसल्याने तिच्या वडिलांनी आणि भावाने कट रचत लेकीच्या प्रेमाची निर्घृण हत्या केली आहे. निलेश हंबीर नावाच्या तरुणाचं गांडुळगावातील एका तरुणीशी गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या प्रेमाला तरुणीच्या घरातून नकार होता. त्यामुळे त्यांनी लेकीच्या प्रियकराची निर्दयीपणे हत्या केली. यामध्ये पोलिसांनी आरोपी पिता आणि भावाला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. निलेश हंबीर आणि तरुणीच्या प्रेम प्रकरणावरून यापूर्वी घरात वाद झाल्याचं तपासात समोर आलं आहे. दोघांच्या प्रेमावरून दोन्ही घरात मोठा वाद झाला होता. त्या अनुषंगाने किन्हवली पोलीस ठाण्यात दोन्ही नातेवाईकांविरोधात कारवाईदेखील करण्यात आली होती. पण तरी दोघांचं रिलेशन सुरू असल्याचं लक्षात येता तरुणीच्या वडिलांकडून हे कृत्य करण्यात आलं. इतर बातम्या - हिंगणघाट- मृत्यूशी झुंझणाऱ्या पीडितेच्या आईने सांगितली अंगावर काटा आणणारा घटना सोमवारी दुपारच्या सुमारास वासिंद इथल्या महाविद्यालयातून परीक्षा देऊन तरुण डोळखांब इथे आली. तिथे निलेश, त्याचा भाऊ दशरथ हंबीर आणि तरुणी एका बाईकवरून गांडुळवाड इथे घरी जाण्यासाठी निघाले. अर्ध्या वाटेमध्ये वाघदरा जंगलाच्या इथे तरुणीचे आरोपी पिता आणि भाऊ प्रियकराला मारण्यासाठी डबा धरून बसले होते. निलेशची बाईक दिसताच त्यांनी रस्त्यात गाडी अडवली आणि त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये निलेश गंभीर जखमी झाला होता. अखेर उपाचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. इतर बातम्या - महाराष्ट्र सरकारला दिलासा, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पोलिसांनी घटनेचा तपास केला असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि आरोपी वडिलांना आणि भावाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, निलेशच्या अशा जाण्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Mumbai crime news

    पुढील बातम्या