मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जगातील सगळ्यात मोठ्या मुस्लीम देशाच्या नोटांवर आहे बाप्पाचा फोटो!

जगातील सगळ्यात मोठ्या मुस्लीम देशाच्या नोटांवर आहे बाप्पाचा फोटो!

जगामध्ये असा एक देश आहे. त्या देशातील नोटांवर गणपती बप्पाचा फोटो छापला आहे.

जगामध्ये असा एक देश आहे. त्या देशातील नोटांवर गणपती बप्पाचा फोटो छापला आहे.

जगामध्ये असा एक देश आहे. त्या देशातील नोटांवर गणपती बप्पाचा फोटो छापला आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
इंडोनेशिया 17 जानेवारी : भाजपचे विरिष्ठ नेते व राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला असा सल्ला दिला की, देशाची अर्थव्यवस्था सुधारक व्हावी म्हणून नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापला पाहिजे. हा सल्ला विश्वास न बसण्यासारखाच आहे. मात्र तुम्ही कधी नोटांवर गणपतीचा फोटो छापलेला पाहिला आहे का? कदाचित नसेलच पाहिला. पण जगामध्ये असा एक देश आहे. त्या देशातील नोटांवर गणपती बप्पाचा फोटो छापला आहे. नोटेवर का आहे गणपतीचा फोटो? जगातील सर्वात मोठी मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया देशामध्ये नोटांवर गणपतीचा फोटो छापला आहे. इंडोनेशिया देशामधील चलनदेखील भारतातील चलनासारखेच आहे. या देशामधील व्यवहार हा रुपयांमध्येच केला जातो. इंडोनेशियामध्ये जवळजवळ 87.5 टक्के लोक इस्लाम धर्माचे असून फक्त 3 टक्केच हिंदू धार्माचे लोक आहे. इंडोनेशियामध्य़े 20 हजारांच्या नोटांवर गणपती बप्पाचा फोटो आहे. खरंतर गणपती या देवाला इंडोनेशिया देशामध्ये शिक्षा, कला, आणि विज्ञान यांचे देवता मानले जाते. इतर बातम्या - फडणवीसांचे विश्वासू आमदार अजित पवारांच्या भेटीला, चर्चेला उधाण नोटेमधील आणखी काही खास गोष्टी इंडोनेशियामधील 20 हजारांच्या नोटांवर पुढच्या बाजूला गणपतीचा फोटो तर मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. यासोबतच नोटेवर इंडोनेशियामधील पहिले शिक्षणमंत्री हजर देवांत्रा यांचा सुद्धा फोटो आहे. हजर देवांत्रा हे इंडोनेशियाच्या स्वतंत्र्याचे नायक ही राहिले आहे. असे देखील बोलले जाते की, काही वर्षांपूर्वी इंडोनेशिया देशाची आर्थिकव्यवस्था पूर्णपणे ढासळली होती. त्यानंतर प्रचंड विचार करून 20 हजाराची नोट तयार करण्यात आली आणि त्या नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला. यावर लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. इतर बातम्या - खाली पडला पण कॅच नाही सोडला! रशीद खानच्या VIDEOने सोशल मीडियावर धुमाकूळ
First published:

पुढील बातम्या