मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कोरोनाबरोबर देशात लुटमारीचं संकट; 25 KM घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेने आकारले 42,000 रुपये

कोरोनाबरोबर देशात लुटमारीचं संकट; 25 KM घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेने आकारले 42,000 रुपये

रुग्णांकडे कोणताही मार्ग नसल्याने ते हजारो-लाखो रुपये देण्यास तयार होतात. याचाच फायदा घेतला जात आहे.

रुग्णांकडे कोणताही मार्ग नसल्याने ते हजारो-लाखो रुपये देण्यास तयार होतात. याचाच फायदा घेतला जात आहे.

रुग्णांकडे कोणताही मार्ग नसल्याने ते हजारो-लाखो रुपये देण्यास तयार होतात. याचाच फायदा घेतला जात आहे.

नोएडा, 1 मे : कोरोना रुग्णांच्या अपरिहार्यतेचा फायदा रुग्णवाहिका चालक उचलत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रुग्णांकडे कोणताही मार्ग नसल्याने ते हजारो-लाखो रुपये देण्यास तयार होतात. अशात नोएडामधून एक धक्कादायत बाब समोर आली आहे. येथे एका कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने 42 रुपये आकारले. रुग्णाच्या कुटुंबाकडे दुसरा पर्याय नव्हता. अवघ्या 25 किलोमीटर लांब असलेल्या रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने तब्बल 42 हजार रुपये आकारले. याचा अर्थ एका किलोमीटरमागे 3500 रुपये आकारण्यात आले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी आपल्या स्तरावर कारवाई केली व चालकापर्यंत पोहोचले. पोलिसांनी नंबर ट्रेस करीत चालकाला ताब्यात घेतलं. चालकाने आपली चूक मान्य केली आणि उर्वरित रक्कम रुग्णाच्या नातेवाईकांकडे सोपवली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या चौकशीदरम्यान रुग्णवाहिका चालकाने सांगितलं की, तो रुग्णाना अनेक रुग्णालयांमध्ये घेऊन गेला आणि त्याला पूर्ण मदत केली. मात्र 25 किलोमीटरसाठी 42 हजार रुपये आकारणे चुकीचेच होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णाच्या कुटुंबीयांना 40 हजार रुपये परत केले.

कोणी तुमच्याकडून अधिक पैसे मागितले तर काय कराल?

पोलिसांनी सांगितलं की, जर कोणी तुमच्याकडून जास्त पैसे मागितले तर वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. अशा लोकांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. कोरोनाच्या संकटात पोलीस, डॉक्टर, नर्सेस आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

First published:

Tags: Corona updates