News18 Lokmat

भेंडी बाजारचा पुनर्विकास रखडवणाऱ्या एकमेव महिला भाडेकरूला कोर्टाचा फटका, १००००चा दंड

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2018 01:15 PM IST

भेंडी बाजारचा पुनर्विकास रखडवणाऱ्या एकमेव महिला भाडेकरूला कोर्टाचा फटका, १००००चा दंड

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : मुंबईच्या गजबजलेल्या भेंडी बाजार भागाच्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्लॅन ज्या एकमेव महिला रहिवाशामुळे रखडला होता, तिची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. ४००० कोटींचं विकास काम रखडवल्याबद्दल तिलाच दंड ठोठावण्यात आला आणि आता दंड भरला नाही, म्हणून तिच्यावर अटकेची नामुष्की ओढवली आहे.

रिडेव्हलपमेंटसाठी आपली जागा न सोडणाऱ्या भेंडी बाजार भागात राहणाऱ्या  सुगरा बेगम यांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. नावाच्या या महिलेनं ४००० कोटी रुपयांच्या या विकास योजनेला विरोध करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे ही योजना अनेक महिने रखडली होती.

सुगरा बेगम  शराफअली मूमजी चाळीत भाडेकरू म्हणून राहात होत्या. या मोडकळीला आलेल्या चाळीत इतर ५३ भाडेकरू होते. त्या सर्वांनी पुनर्विकासासाठी आपापल्या जागा सोडून स्थलांतर केलं होतं. पण बेगम यांनी ही जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचा दावा करत जागा सोडण्यास नकार दिला होता.

भेंडी बाजार भागातल्या २५० जुन्या आणि धोकादायक इमारती पाडून त्या जागी नव्या इमारती बांधण्याचा म्हाडाचा प्लॅन आहे. यामध्ये १२५० दुकानं आणि ३२०० राहत्या कुटुंबांचं पुनर्वसन होणार आहे. इतर सर्वांनी आपापल्या जागा सोडून तात्पुरत्या जागेत स्थलांतर केल्यानंतर सुगरा बेगम यांनी जागा न सोडल्याने इमारत पाडण्याचं काम रखडलं होतं.

गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या मदतीने म्हाडानं बेगम यांना घर खाली करायला लावावं, असा आदेश दिला होता. याविरोधात बेगम सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या. पण सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावत त्यांना १० हजार रुपयांचा दंड केलाय.

Loading...

दंडाची रक्कम जमा करायला कोर्टाने त्यांना २ आठवड्यांची मुदत दिली आहे. या मुदतीत पैसे जमा केले नाहीत, तर बेगम यांना अटक होऊ शकते.

एवढं मोठं विकाम काम रखडवणाऱ्या या एकमेव भाडेकरूविरोधात म्हाडाच्या बाजूने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि श्याम दिवाण यांनी खटला लढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...