लंडनच्या मेट्रोस्टेशनवरील बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच !

लंडनच्या मेट्रोस्टेशनवरील बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच !

लंडनच्या भूमिगत मेट्रो रेल्वेस्टेशनवर स्फोट झालाय. त्यात काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या स्फोटानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाल्याने थोडीफार चेंगराचेंगरीही झाली. लंडनमधील प्रमाणवेळेनुसार सकाळी सव्वाच्या सुमारास हा स्फोट झालाय.

  • Share this:

लंडन, 15 सप्टेंबर : लंडन मेट्रोमध्ये आज दहशतवादी हल्ला झाला.. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. एका सिलेंडर सदृश वस्तूचा मेट्रोमध्ये स्फोट झाला.. यामध्ये एक महिला जखमी झाली. पण स्फोटानंतरच्या अफरातफरीमुळे जी चेंगराचेंगरी झाली, त्यात अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांची नेमकी संख्या अजून कळायचीय. या ट्रेनमध्ये अनेक शाळकरी मुलंही होती. स्फोट होताच ट्रेनच्या केबल्समधून आगीचा मोठा लोळ बाहेर पडला.. लंडनच्या डिस्ट्रिक्ट लाईन या मेट्रो मार्गावर पार्सन्स ग्रीन नावाचं स्टेशन आहे. तिथे हा स्फोट झाला.

भूमिगत मेट्रोस्टेशनवरच्या या स्फोटानंतर  लंडनची सगळी आपात्कालीन यंत्रणा सतर्क झालीय. ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. हा बॉ़म्ब नेमका कुणी पेरला याचा सध्या तपास सुरू आहे. लंडनचे पोलीस सर्व मेट्रो स्थानकांचं सीसीटीव्ही फुटेज तपासतायेत. लंडन हे शहर अनेक महिन्यांपासून हाय अलर्टवर आहे. तिथे गेल्या काही महिन्यांमध्ये 4 दहशतवादी हल्ले झालेत. त्यामुळे प्रवासी जास्त घाबरले आणि चेंगराचेंगरी झाली. जगभरातून या हल्ल्याचा निषेध होतोय.

Work colleague was on district line train at Parsons Green when bag exploded #london pic.twitter.com/1yXOsFVAJ1

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 05:20 PM IST

ताज्या बातम्या