लंडनला राहणाऱ्या एका भारतीयाकडे आहेत 15 रोल्स राॅइस

लंडनला राहणाऱ्या एका भारतीयाकडे आहेत 15 रोल्स राॅइस

रोल्स राॅइस कार खरेदी करणं हे कुणाचंही स्वप्न असू शकतं. अनेकदा ते फक्त स्वप्नच ठरतं. पण लंडनला अशी एक व्यक्ती आहे जिच्याकडे 15 रोल्स राॅइस कार्स आहेत.

  • Share this:

मुंबई, 04 फेब्रुवारी : रोल्स राॅइस कार खरेदी करणं हे कुणाचंही स्वप्न असू शकतं. अनेकदा ते फक्त स्वप्नच ठरतं. पण लंडनला अशी एक व्यक्ती आहे जिच्याकडे 15 रोल्स राॅइस कार्स आहेत.


लंडनमध्ये वास्तवाला असलेल्या रुबेन सिंग या भारतीयाकडे एक नाही, दोन नाही 15 रोल्स राॅइस या लक्झरी कार्स आहेत. रुबेननं नुकत्याच 50 कोटींपेक्षा जास्त अशा 6 नव्या कोऱ्या रोल्स राॅइस खरेदी केल्यात.


रुबेन सिंग लंडनला एक फिनॅन्शियल कंपनी चालवतात. त्यांनी त्यांच्या नव्या कार्सचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. त्यांनी सोशल मीडियावप टर्बन चॅलेंज स्वीकारला होता. वेगवेगळ्या रंगाच्या कारला मॅच होतील अशा पगड्या घालून 7 दिवस फोटो शेअर केले होते. ते इंटरनेटवर व्हायरल झाले.


त्यांच्या कलेक्शनमध्ये नव्या 6 उबर लक्झकी कार्स आहेत. या ज्वेल कलेक्शन म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या रंगावरून हे नाव पडलंय. रुबी, एमराल्ड आणि नीलमणी रंगांच्या या कार्स आहेत.रुबी आणि एमराल्ड रंगाच्या कार्स काही दिवसांपूर्वी आल्या. त्यानंतर नीलमणी रंगाची कारही आली. सिंग म्हणतात, अजूनही कारला जागा आहे. त्यांना गमतीनं ब्रिटिश बिल गेट्स संबोधलं जातं.


रुबेन सिंग यांनी युकेचे पंतप्रधान टाॅनी ब्लेअरच्या सरकारमध्ये अधिकारी म्हणून काम केलंय.  ब्रिटिश सरकारमध्ये यांनी महत्त्वाची पदं भूषवलीत.


रोल्स राॅइसव्यतिरिक्त त्यांच्याकडे Bugatti Veyron, Porsche 918 Spyder, Pagani Huayara, Lamborghini Huracan  आणि Ferrari F12 Berlinetta या कार्सही आहेत.


रोल्स राॅइसचे सीईओंनी स्वत: ज्वेल कलेक्शन रुबेन यांच्याकडे पोचवले. भारतात नुकतीच लाँच झालेल्या रोल्स राॅइसची किंमत आहे 6.95 कोटी रुपये आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2019 06:30 PM IST

ताज्या बातम्या