एसटीतून फुकट प्रवास करू दिला नाही म्हणून पोलिसाची कंडक्टरला मारहाण

एसटीतून फुकट प्रवास करू दिला नाही म्हणून पोलिसाची कंडक्टरला मारहाण

लोणावळ्याच्या हॉटेलबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत पोलिसाची ही मुजोरी कैद झालीये.

  • Share this:

30 आॅक्टोबर : एसटीतून मोफत प्रवासाला मनाई करणाऱ्या कंडक्टरला पोलिसाने मारहाण केल्याची घटना लोणावळ्यात घडलीये. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून फुकट्या पोलिसाचा शोध घेतला जात आहे.

उर्से टोल नाक्यापासून एक पोलीस लोणावळ्यापर्यंत प्रवासासाठी एसटीत चढला. पोलिसानं तिकीट घेऊन प्रवास करावा असं कंडक्टर गुलाब मुलाणी यांनी केली. पण पोलिसांनी तिकीट मागणाऱ्या कंडक्टरला मारहाण केली. लोणावळ्याच्या हॉटेलबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत पोलिसाची ही मुजोरी कैद झालीये.

ही घटना काल दहा वाजण्याच्या सुमारास घडली. लोणावळा येथील एनएच 4 बसथांबा येथील हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पोलिसाचा हा प्रताप कैद झाला आहे.

काल घडलेला या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठयाप्रमाणात व्हायरल झाला आहे. एस टी कंडक्टर मुलानी यांनी मारहाण झाल्या संदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अनोळखी पोलिसाविरुद्ध तक्रार दाखल केली असून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या अनोळखी पोलिसाचा शहर पोलीस शोध घेत आहेत.

First published: October 30, 2017, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading