'निवडणुकीत उमेदवाराचा पराभव झाल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी'

'निवडणुकीत उमेदवाराचा पराभव झाल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी'

राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या मतदारसंघात जर पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात येईल.

  • Share this:

चंदीगड, 24 एप्रिल: लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांवर उमेदवार निवडूण आणण्याची जबाबदारी आहे. अनेक नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अशातच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांना धमकी वजा इशाराच दिला आहे.

राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या मतदारसंघात जर पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात येईल. विशेष म्हणजे हा आदेश पक्षश्रेष्ठींकडून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. राज्य सरकरामधील मंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यास मंत्रिपद गमवावे लागू शकते, अशा थेट इशारा अमरिंदर सिंग यांनी दिला आहे. पंजाबमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी खराब झाली होती. राज्यातील 13 पैकी केवळ 3 जागा पक्षाला जिंकता आल्या होत्या. तेव्हा खुद्ध अमरिंदर सिंग यांनी भाजपचे नेते अरुण जेटली यांचा अमृतसर येथून पराभव केला होता. यात मतदारसंघातून दोन वेळा भाजपचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी विजय मिळवला होता.

यंदा राज्यात काँग्रेसची परिस्थिती 2014च्या तुलनेत चांगली आहे. राज्यात सध्या काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे पक्षाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. राज्यात अमरिंदर सिंग यांच्या रुपाने एक मोठा चेहरा आहे. यंदा राज्यातून युपीएमधील अनेक माजी केंद्रीय मंत्री देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अधिक उमेदवार विजयी व्हावेत यासाठी पक्षाकडून मंत्र्यांवर असा दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे.


VIDEO : अलादीनचा चिराग सापडला तर कोणत्या इच्छा पूर्ण करणार? मोदी म्हणाले...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 07:42 PM IST

ताज्या बातम्या